27 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयभेसळ पदार्थांवर बसणार चाप; तब्बल १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भेसळ पदार्थांवर बसणार चाप; तब्बल १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

राज्यात भेसळ पदार्थांचे अधिकच प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे आता दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांसाठी ही धोकादायक बाब असल्याचे सांगितले जात आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावर काही दुध उत्पादक दुधात काही ना काही भेसळ करत असतात. यापासून मिठाई, गोड खाद्यपदार्थ, खवा, मावा असे अनेक वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची निर्मिती होते. मात्र सणोत्सवाच्या तोंडावर भेसळ पदार्थांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने जातीने लक्ष घातले आहे. विलेपार्ले येथील संभाजी नगरमधील दुधविक्रेता साईदुळू मल्लेशवर कारवाई करून अमूल कंपनीचे ५ हजार ७९८ रुपये किंमतीचे १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे.

सध्या दिवाळीचा काळ असून या दिवसात लक्ष्मीपुजन, भाऊबीज, पाडवा, धनत्रेयादशी साजरी केली जात असून ओवाळणीनंतर गोड पदार्थ भरवण्याकडे नातेवाईकांचा अधिक कल असतो. यामुळे घरात काही ना काही गोडधोड बनत असते. मात्र या पदार्थात काही वेळा भेसळ केलेली असू शकते, तिच भेसळ होऊ नये, यासाठी आता पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, साकीनाका आणि बोरिवली येथे भेसळ करणाऱ्यांविरोधात आक्रमक कारवाई करून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध, मावा, सूर्यफूल आणि पामोलिन तेल जप्त करण्यात आले आहे.

हे ही वाचा

कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी काढली अजित पवारांची खरडपट्टी

रायगडमध्ये उभारणार सुपारी संशोधन केंद्र, आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यांना यश

भारताविरुद्ध पराभवामुळे क्रिकेट बोर्ड हटवला, मग कोर्टाने बरखास्त केला निर्णय…

निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ

सणोत्सवाच्या तोंडावर अन्न पदार्थ भेसळ करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र त्याचे परिणाम हे नागरिकांना भोगावे लागतात. नागरिकांना सकस, स्वच्छ, सुरक्षित, दर्जेदार गुणवत्ता आणि दर्जेदार आहार मिळावा याची खात्री आता अन्न व  प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई करत मोहिम हातात घेतल्याची माहिती आता समोर आली आहे.

१०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

सोमवारी विलेपार्ले येथे अमूल कंपनीचे ५ हजार ७९८ रुपये किंमतीचे १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. भेसळ करणाऱ्याचे नाव हे साईदुळू मल्लेशवर असून त्यावर कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखा युनिट ८ सोबत केली. त्याचप्रमाणे बोरिवली पूर्व येथील ब्रिजवासी मावावाला या दुकानावर (४ नोव्हेंबर) कारवाई करण्यात आली. यावेळी किरकोळ विक्रीसाठी ठेवलेले गोकुळ कंपनीचे तूप तसेच ५२ हजार २७० रुपयांचा २०९ किलो मावा जप्त केला. कारवाई दरम्यान अन्नपदार्थांवरील वेष्टनात फेरफार, अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची साठवणूक करण्यात आल्याचे आढळून आले.

साकीनाका येथील अरबाज बरादिया यांच्या मालकीच्या मे. प्रगती ऑईल मिलवर टाकलेल्या छाप्यात १ लाख ७ हजार १२० रुपये किमतीचे रिफाईन सूर्यफूल तेल, पामोलिन तेल जप्त करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे तेल आणि अस्वच्छता असल्याचे यावेळी आढळून आले. तसेच ३ नोव्हेंबर रोजी साकीनाका येथील मे. मंगलदीप फूड्सवर टाकलेल्या छाप्यात ५ हजार २६५ रुपयांचे ५८ किलो पामोलिन जप्त करण्यात आले. या तेलाचा पुनर्वापर करण्यात आल्याचे आढळून आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी