32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी अजित पवारांची काढली खरडपट्टी

कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी अजित पवारांची काढली खरडपट्टी

राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याची सुव्यवस्था, कायदा धोक्यात आली असल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे. कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर टीकेचे आसूड सोडत चांगलेच फटकारले आहे. त्यांनी राज्यात सुरू असलेल्या प्रकरणावर भाष्य करत भाजप सरकारला दोषी ठरवले आहे. पटोले भाजपबाबत बोलत असताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत राज्यात सुरू असलेल्या अनेक ज्वलंत समस्यांवर पांघरूण टाकण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. त्याचवेळी हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीतही पटोले यांनी वर्तवले आहे.

राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी आरोप-प्रत्यारोप हे पाचवीला पूजले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता, प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. यावर नाना पटोले यांनी ग्रामपंचायत निवडणूक, मराठा आरक्षण, ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करत भाजपची कान उघडणी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी याद्या भाजपने दाखवाव्यात आणि मगच विजयाचे दावेदार म्हणून सांगावे, असे थेट आव्हान पटोले यांनी भाजपला दिले आहे. दरम्यान, जनतेचे महत्त्वाचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, गोरगरीबांचे प्रश्न लपवण्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला असल्याचाही आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

हे ही वाचा

रायगडमध्ये उभारणार सुपारी संशोधन केंद्र, आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यांना यश

भाजप लोकांची माफी मागणार का? रोहित पवार यांचा सवाल

भुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच माणसांनी फोडले?

अजित पवारांची खरडपट्टी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यू झाल्याने अजित पवार आराम करत असून ते फारसे दौऱ्यावर दिसत नाहीत. मराठा आरक्षणाची बैठक झाली होती, तरीही अजित पवार गैरहजर होते. मात्र त्यांच्याऐवजी शरद पवारांनी आपली उपस्थिती दाखवली होती. अजित पवारांच्या आजारपणावर डेंग्यू झालेल्या मंत्र्यांना कोण कोठे काय करतंय माहित नाही, असा टोला पटोलेंनी लगावला आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या कंपन्यांबाबत बोलताना गुजरात पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर गेल्याबाबात प्रश्न उपस्थित केले आहेत.

शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र

राज्यात काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरण सुरू आहे. यावेळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ड्रग्ज प्रकरणावरून हमरातुमरीवर आले होते. राज्यात खुलेआम ड्रग्ज माफिया जन्माला येत आहेत. राज्यात वाद पेटवण्याचे काम सुरू आहे. या मद्द्यावर पटोले दावा करत म्हणाले, जळता महाराष्ट्र पाहायचा नाही. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करा, या महाराष्ट्रात युवकांना रोजगार द्या. गरीब आणि श्रीमंत या दोन्हीच जाती ठेवण्याचा भाजपचा मनसुबा असेल तर ते कळाले पाहिजे. एका बाजूला लोकांची मते घ्यायची, आरक्षणाचे गाजर दाखवायचे आणि आरक्षण संपवायचे, अशी जोरदार टीका करत पटोलेंनी सत्ताधारी पक्षांना फटरले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी