राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू असून अशा स्थितीत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आता वादात सापडले आहेत. यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत विशेष तपास सुरू आहे. याबाबत आदित्य ठाकरेंचं नाव आता पुढं येत असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. याआधी विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आरोप केले होते. भाजपचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं आहे. यामुळे आता एसआयटी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी टीम दिशा मृत्यूप्रकरणाबाबत काम करेल. चौकशीसाठी आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवल्यास ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया उमटून येतील आणि त्यांच्या नेमक्या काय भावना असतील हे वेळ आल्यावर कळेल. अशातच आता हिवाळी अधिवेशन आहे आणि अशा स्थितीत आदित्य ठाकरेंची चौकशी केल्यास हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नारायण राणेंचा दिशा सालियन मृत्यूप्रकरणाबाबत आदित्य ठाकरेंवर आरोप
याआधी अनेकदा नारायण राणे आणि नितेश राणेंनी सालियन मृत्यूप्रकरणी अनेक पत्रकारपरिषदा घेत आदित्य ठाकरेंवर टीका केल्या होत्या. दिशा सालियन प्रकरण हे ८ जूनला झालं असून १३ जूनला सुशांत सिंग राजपूतच्या झालेल्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आले होते. अशातच दिशा सालियन प्रकरणाबाबत अनेकदा उद्धव ठाकरेंनी मला फोन करत असे काही बोलू नका, असे काही करू नका असं सांगितल्याचं नारायण राणे म्हणाले होते.
हे ही वाचा
‘जितेंद्र आव्हाड राजकारणातले राखी सावंत’
शिर्डीतील निर्मळ पिंपरीत दलित कुटुंबाला मारहाण
देवेंद्र फडणवीसांचे एसआयटी चौकशीसाठी आदेश
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर एसआयटी चौकशीसाठी गत हिवाळी अधिवेशनात आदेश दिले होते, यावेळी आदित्य ठाकरे कुठं होते? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. अशातच आता शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंच्या नावाचा आदू असा उच्चार करत टीका केली आहे.
आदूची लवकरच एसआयटी चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय! दुबईत वातावरण बदलाच्या बैठकीत जाण्यापेक्षा आदूने लोकांचे प्रश्न मांडायला नागपूरला अधिवेशनात उपस्थित राहणं गरजेचं होतं!! पण हे सगळं सोडून आदू फिरतीवर…!!! लोकांनी निवडून का दिलयं? याचा ही…
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) December 7, 2023
काय म्हणाल्या शितल म्हात्रे?
हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर आदू हे फिरतीवर असून आदूची लवकरच एसआयटी चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची दिशा बदलून थेट दुबई गाठलीय! दुबईत वातावरण बदलाच्या बैठकीत जाण्यापेक्षा आदूने लोकांचे प्रश्न मांडायला नागपूरला अधिवेशनात उपस्थित राहणं गरजेचं होतं! पण हे सगळं सोडून आदू फिरतीवर…!!! लोकांनी निवडून का दिलयं? याचा ही महाराष्ट्रातील पप्पूला विसर पडलाय बहुतेक!!!