31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमुंबईकरांनो आता दोनच तास वाजवा फटाके नाहीतर...

मुंबईकरांनो आता दोनच तास वाजवा फटाके नाहीतर…

देशात दिवाळी (Diwali Festival) सणाला अधिक महत्व असते. हा सण म्हणजे आनंदी आनंदगडे जिकडेतिकडे चोहीकडे. आकाशकंदीलाने उजळेल आयुष्यातील रोशनाई. पणत्यांनी अंगणात होईल लखलखाट, सर्वत्र असेल दिवाळी पहाट. मात्र आता हा सण मुंबईसाठी नियमावलीचे पालन करूनच करता येणार आहे. कारण दिवाळी म्हटलं की सर्वात आधी फटाके डोळ्यासमोर येतात. मुंबई या शहराचे प्रदूषण (Mumbai Polution) अधिक वाढले आहे. याचा दुष्परिणाम हा मुंबईकरांवर होत असून हवामानात (Air Polution) फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागला आहे. यासाठी आता मुंबई महापालिकेने (BMC) कडक उपाययोजना केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high Court) दोनच तास फटाके वाजवण्याची परवानगी दिली आहे.

दिवाळी सण हा हिंदू सणांचा राजा असल्याची माहिती शाळेत असताना दिली होती. मात्र आता मुंबईसारख्या शहरात दिवाळी सणामध्ये फटाके फोडण्याची नियमावली उच्च न्यायालयाने आखून दिली आहे. रात्री ८ ते १० च्या दरम्यान केवळ दोनच तास फटाके फोडावेत. असे आदेश कोर्टातून आले आहेत. महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी उच्च न्यायालयाचा आदर करावा आणि कमी प्रदूषण करणारे फटाके वाजवावेत असे मुंबईकरांना अवाहन केले आहे.

हे ही वाचा

‘क्वीन’ कंगना कधी बनली ‘प्लॉप क्वीन’? आता देवदर्शनाचा सपाटा

टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी गिलख्रिस्टने सांगितला कानमंत्र

मलायका अरोरा… आईच्या भूमिकेत

मुंबईकरांना आयुक्तांचे आवाहन

दरम्यान, अनेकदा सणोत्सवात नेतेमंडळी कोणत्याही मुद्द्यावरून राजकारण करतात. मात्र प्रदूषण ही समस्या मुंबईकरांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. यासाठी मुंबईकरांनी याबाबत संवेदनशिल व्हावे, असे अवाहन महापालिकेकडून होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ईमारतींच्या बांधकामांमुळे प्रदूषण वाढले आहे. यातून धूळ पसरली जात असून मोठी समस्या देखील निर्माण होत आहे. धूळ अधिक पसरू नये, म्हणून वेगवेगळी कामे हाती घेतली आहेत. मात्र हे काम नुसते महापालिकेने आणि प्रशासनाने घेऊन चालणार नाही. यासाठी सर्व नागरिकांची जोड मिळायला हवी, असे आयुक्त म्हणाले आहेत.

कोविडची आठवण करून देत आयुक्त म्हणाले

महापालिका आणि आयुक्तांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपल्या मदतीनेच प्रदूषण टाळता येईल. कोवीडच्या काळातही महापालिकेच्या विनंतीमुळे मुंंबईकरांनी फटाके फोडणं टाळलं होतं. आजही याची आठवण करून देत तशाच प्रकारचे सहकार्य यंदा दिवाळी सणामध्ये करावे, असे अवाहन आयुक्तांनी मुंबईवासियांना केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी