27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेटटीम इंडियाचा पराभव करण्यासाठी गिलख्रिस्टने सांगितला कानमंत्र

टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी गिलख्रिस्टने सांगितला कानमंत्र

देशात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वनडे विश्वचषक (ICC Cricket Worldcup) आता अंतिम टप्प्यात आला आहे. सुरू असलेल्या विश्वचषकात टीम इंडिया दमदार कामगीरी करत आहे. या विश्वचषकाला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक दिवसांपासून काही ना काही नवीन ट्वीस्ट घडत आहेत. विराटच्या शतकाबाबत अनेकदा चर्चा केली जात होती. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅक्सवेलने केलेले द्विशतक तर श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यात झालेला टाईम आऊटचा कीस्सा यामुळे हा विश्वचषक अधिक चर्चेत आला आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) टीम इंडियाचा (Team India) पराभव करण्यासाठी कानमंत्र दिला आहे.

सुरू असलेल्या विश्वचषकात टीम इंडियाने ८ पैकी ८ ही सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडिया सध्या पहिल्या क्रमांकावर असून विरूद्धसंघावर प्रत्येक सामन्यात एकहाती विजय मिळवत आहे. टीम इंडिया अनेकदा नाणेफेकी जिंकत असल्याने याचा फायदा संघाला झाला आहे. तर टीम इंडियाचा गोलंदाज बुमराह परस्पर संघाच्या फलंदाजांवर दबाव आणण्याची कामगीरी करत आहे. शमीला विश्वचषकात पुन्हा संधी दिल्याने त्याने पुरेपूर फायदा घेत प्रत्येक सामन्यात ४-५ गडी बाद करण्याची चोख भूमिका वठवली आहे. तर सिराजही तोडीसतोड देऊन गोलंदाजी करत चांगली कामगीरी करत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी गिलख्रिस्टने किवींना कानमंत्र दिला आहे.

हे ही वाचा

मलायका अरोरा… आईच्या भूमिकेत

डिलिव्हरी बॉय, मुले अन् गृहिणींचेही प्रतिज्ञापत्र, राष्ट्रवादीच्या सूनावणीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

सिकंदर शेखने पटकावली ‘महाराष्ट्र केसरी’ ची गदा

काय म्हणाले गिलख्रिस्ट?

टीम इंडियाचा विजयी रथ थांबवणे खूपच अवघड होऊन बसले आहे. दरम्यान, यासाठी गिलख्रिस्टने टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी प्रथम फलंदाजी करण्यासाठी द्यावी. प्रथम टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंडियावर दबाव येईल. मात्र, ज्यावेळी इंडिया पाठलाग करत असते, त्यावेळी सिराज, बुमराह, शमी क्लास गोलंदाजी करतात. तोच संकल्प जर इंडियाविरूद्ध आखला तर धावा करणे सोपे होऊन जाईल. टीम इंडियाने विश्वचषकात ८ सामन्यातून ५ सामन्यात प्रथम गोलंदाजी करत विजय मिळवला आहे. तर उर्वरीत ३ सामन्यात प्रथम फलंदाजी करत विजय मिळवला आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सुरूवातील फलंदाजीसाठी येतो. धावा जमावतो, त्यानंतर बाद झाला तरीही इतर फलंदाज कोणत्याही दबावाला न जुमानता फलंदाजी करतात. दरम्यान, २०१९ मध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडने पराभव केला होता. पुन्हा एकदा आता टीम इंडियाला विजय मिळवण्याची संधी आहे. यामुळे आगामी होणारा सामना आता पुन्हा एकदा न्यूझीलंड संघासोबत होणार असून या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी