28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयहसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र मुश्रीफ यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. त्यावर ईडी आणि मुश्रीफ यांच्यावतीने युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने मुश्रीफांना अंतरीम दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने १४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.

हसन मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास ईडी करत असून मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत ईडीचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने मुश्रीफ यांचा अर्ज फेटाळून लावला. मात्र या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुश्रीफ यांच्या वकिलांनी अंतरिम आदेश दिलासा देण्याची मागणी केली. यावर ईडी आणि मुश्रीफ दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकुन घेतल्यानंतर न्यायालयाने मुश्रीफ यांना तीन दिवसांचा दिलासा दिला आहे. मुश्रीफ यांच्यावर १४ एप्रिलपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेता सलमान खान याला धमकी देणारा बालक पोलिसांच्या ताब्यात

वनमंत्री मुनगंटीवार यांनी घडविला चमत्कार; महाराष्ट्रात वाघांची संख्या ४०० च्या पार !

मालवणीची ‘दगडफेक-दंगल’ पूर्व नियोजित; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

कोर्टाने मुश्रीफ यांचा अटपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता उच्च न्यायालयातून मुश्रीफ यांना दिलासा मिळाला नाही तर मुश्रीफ यांना अटक होऊ शकते. मुश्रीफ यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता असून उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ते प्रयत्न करु शकतात. मुश्रीफ यांना साखर कारखाण्यातील आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडीने समन्स पाठविले होते. त्यानंतर मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयातून काही दिवस अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर ते ईडीच्या चौकशीला हजर राहीले. मात्र आजच्या सुनावणीत न्यायालयाने मुश्रीफ यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला असून त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत दिलासा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी