28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
HomeराजकीयPolitics : भगवा फडकवा हे भाषण ३० वर्षांपासून ऐकतोय! - शरद पवार

Politics : भगवा फडकवा हे भाषण ३० वर्षांपासून ऐकतोय! – शरद पवार

टीम लय भारी

नाशिक : ‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे भाषण ३० वर्षांपासून ऐकत आहे. (Politics)  प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायच्या की स्वतंत्र, हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील, असं पवारांनी स्पष्ट केलं. भाजपाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलात तर लोकांना चांगली फळं मिळताना दिसत आहेत, त्यामुळे त्याच दिशेने काम करा, असा सल्लाही यावेळी शरद पवारांनी दिला.

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री १० वाजता सुरु झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली. यंदा कोव्हिडच्या काळात राज्य सरकारकडे निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी