31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयशांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज यांच्याशी दोन वेळा बोललो. आजदेखील काही साधू महंतांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिला आहे. ते देखील पुन्हा एकदा शांतिगिरी महाराज त्यांचाशी माघारीबद्दल चर्चा करणार आहेत असे मुखमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नाशिकमध्ये बुधवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्याशी दोन वेळा बोललो. आजदेखील काही साधू महंतांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिला आहे. ते देखील पुन्हा एकदा शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) त्यांचाशी माघारीबद्दल चर्चा करणार आहेत असे मुखमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) म्हणाले. नाशिकमध्ये बुधवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) बोलत होते.(I have contacted Shantigiri Maharaj twice for withdrawal: CM Shinde)

मुखमंत्री शिंदे म्हणाले कि अनेक आखाडे , साधुमहंत आणि वारकरी संप्रदाय यांनी राज्यात महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. पालघर साधू हत्याकांड बाबत मागील राज्य सरकारने काळजी दाखवली नाही आम्ही मात्र त्यात लक्ष घातले. जे मृत पावले त्यांचे कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतली जाईल असे शिंदे म्हणाले. २०० आमदारांचे सरकार एक महिन्यात पडेल दोन महिन्यात पडेल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली होती मात्र त्यांना अजूनही चांगला ज्योतिषी भेटला नाही. त्यांच्याकडे फक्त शिव्याशाप, आरोप प्रत्यारोप आहेत मात्र आमच्याकडे विकास आहे आणि त्या आधारे आम्ही लोकांसमोर जात आहोत. कुंभमेळा तयारीबाबत देखील साधुमहंत यांच्याशी चर्चा झाली असून निधी कमी पडू देणार नाही असे मुखमंत्री शिंदे म्हणाले. कांदा निर्यातबंदीबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले

संभाजीनगर नाव कायम राहणार
नाशिकमध्ये येण्यापूर्वीच एक आनंदाची बातमी समजली. संभाजीनगर नावावर आक्षेप घेत जी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती ती फेटाळनयेत आली आहेत्यामुळे संभाजीनगर असो कि धाराशिव हीच नावे कायम राहतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी