30 C
Mumbai
Monday, September 16, 2024
HomeराजकीयTeacher's Election | ज. मो. अभ्याकरांंनी शिक्षकांचं वाटोळं केलं, शिवसेनेचा चुकीचा उमेदवार

Teacher’s Election | ज. मो. अभ्याकरांंनी शिक्षकांचं वाटोळं केलं, शिवसेनेचा चुकीचा उमेदवार

सुभाष मोरे ह्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ज. मो. अभ्याकरां विरुध्द उभे आहेत.ह्या आधी कपील पाटील हे गेले तीन टर्म मुंबई शिक्षक मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.परंतु यंदा कपील पाटील निवडणूक लढणार नाहीत असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांचे सहकारी सुभाष मोरे ही निवडणूक लढवत आहेत.

लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली आहे असे असले तरीही शिक्षक व पदवीधर निवडणूकांची धामधुम सुरू झालेली आहे(J. M. Abhyankar fooled teachers, wrong candidate of Shiv Sena).त्यातच मुंबई शिक्षक मतदार संघ महत्त्वाचा मतदार संघ आहे.ह्याच पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी सुभाष मोरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे.सुभाष मोरे ह्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ज. मो. अभ्याकरां विरुध्द उभे आहेत.ह्या आधी कपील पाटील हे गेले तीन टर्म मुंबई शिक्षक मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.परंतु यंदा कपील पाटील निवडणूक लढणार नाहीत असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांचे सहकारी सुभाष मोरे ही निवडणूक लढवत आहेत.सदर मुलाखतीमध्ये कपील पाटील का निवडणूक लढवत नाही आहेत?असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर , कपील पाटील ह्यांची लोकशाही मूल्यांवर निष्ठा आहे आणि जसे शिक्षक वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्ती घेतात त्या नियमांच्या अनुशंगाने त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे असे सुभाष मोरेंनी लय भारीचे संपादक तुषार खरात यांना सांगितले त्याच बरोबर ज.मो.अभ्याकरांनी शिक्षकांचं कशा प्रकारे वाटोळे लावले आहे आणि शिक्षक अभ्यंकरांनवर का व कशा प्रकारे नाराज आहेत याचाही खुलासा सदर मुलाखतीत केला गेलेला आहे.देशात धर्मनिरपेक्षता टिकून राहावी,केजी ते पीजी मोफत शिक्षण त्याच बरोबर विद्यार्थांन पर्यंत खरा इतिहास पोहचवणे, त्यांना स्वावलंबनाचे धडे देणे व कंत्राटीकरण, खाजगीकरणाचा विरोध करुन सामाजवादी विचारसरणीसाठी काम करणार असे सुभाष मोरेंनी सदर मुलाखतीत सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी