28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
HomeराजकीयUddhav Thackeray: जयदेव ठाकरेंचा शिंदे गटाला पाठींबा; मुलगा जयदीप मात्र उद्धव...

Uddhav Thackeray: जयदेव ठाकरेंचा शिंदे गटाला पाठींबा; मुलगा जयदीप मात्र उद्धव काकांसोबत

जयदेव ठाकरे यांच्या मुलाने मात्र आपले काका म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे जाहीर केले आहे. जयदेव ठाकरे यांच्या पहिल्या पत्नी जयश्री ठाकरे यांचा मुलगा जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे वडील जयदेव ठाकरे शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित असताना मुलगा जयदीप मात्र शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला हजर होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर अनेक आमदार, खासदार इतकेच काय पण ठाकरे कुटुंबातील काही सदस्य देखील आपल्या गटामध्ये सहभागी करुन घेतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, वाढवली. बाळासाहेब ठाकरे असताना देखील शिवसेनेत बंड झाले. काही आमदार शिवसेना सोडून बाहेर पडले. पण आता उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेची सुत्रे असताना शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेतच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेनेचे १२ खासदार आणि जवळपास ४० आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्याचबरोबर ठाकरे कुटुंबातील सदस्य जयदेव ठाकरे, त्यांच्या घटस्फोटीत पत्नी रश्मी ठाकरे, बिंदुमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

रश्मी ठाकरे, निहार ठाकरे यांनी याआधी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत, त्यांच्या गटास पाठिंबा दिला. तसेच नुकतेच बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या बीकेसी मैदानावर पार पडलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहत एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठींबा दिला. तसेच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची देखील गणेशोत्सव काळात भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे देखील शिंदे गटाला पाठींबा देणार का अशा चर्चा रंगल्या होत्या.

एकीकडे हे सर्व घडत असताना जयदेव ठाकरे यांच्या मुलाने मात्र आपले काका म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे जाहीर केले आहे. जयदेव ठाकरे यांच्या पहिल्या पत्नी जयश्री ठाकरे यांचा मुलगा जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे वडील जयदेव ठाकरे शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित असताना मुलगा जयदीप मात्र शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला हजर होते.

हे सुद्धा वाचा –

Eknath Shinde : एकनाथ शिंदे रात्री आठ वाजता सुद्धा सामान्य लोकांना भेटतात

Eknath Shinde: शिंदे गटाचा कार्यकर्ता दसरा मेळाव्याला आला, पण….

Kartik Kumar : फरार असणारा कार्तिक कुमार निवडणूक प्रचारात व्यस्त? फोटो व्हायरल

जबाबदारी दिल्यास पार पाडेन –

जयदीप ठाकरे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, राजकारणातील सध्याचे चित्र पाहता कुटुंबासोबत असणे मी महत्त्वाचे मानतो. आजोबा (बाळासाहेब ठाकरे) उद्धव काका, रश्मी काकी आणि आदित्य यांच्या मी नेहमी संपर्कात असतो. या सर्वांचा मी आदर करतो. सध्या मी कला क्षेत्रात आहे. कला ही मला वारसाहक्काने मिळाली आहे. पण भविष्यात जर उद्धव काका यांनी मला एखादी जबाबदारी सोबवली, तर मी नक्कीच स्वीकारून पक्ष वाढवण्यासाठी नक्कीच हातभार लावेन.

उद्धवकाका आणि राजकाका एकत्र आले तर आवडेल –

उद्धव काकांना बरं नसताना जे घडलं ते चूकच होते. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यातील गर्दी पाहून खरी शिवसेना कोण हे कळलंय. उद्धवकाका आणि राजकाका एकत्र आले तर महाराष्ट्राला आवडेल, पण एकत्र यायचं की नाही, ते त्यांच्यावर आहे, मुळात त्यांना एकत्र यायचंय की नाही, हे मला माहिती नाही. आदित्य खूप चांगलं काम करत आहे असे देखील जयदीप यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी