31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय"साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळं मिळालं त्यांनीच..." जितेंद्र आव्हाड भावूक; ट्वीट...

“साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळं मिळालं त्यांनीच…” जितेंद्र आव्हाड भावूक; ट्वीट करत दिली माहिती

राज्याचे राजकारण एका वेगळ्याच पातळीवर गेलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यातील राजकारणात कोणत्याच राजकीय पक्षाचा ताळमेळ राहीला नाही. एका वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फुटला आणि चाळीस आमदरांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याचच अनुकरण आता अजित पवार यांनी केलं आहे. ते आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार करत आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी हा पक्ष आमचा असल्याचा दावा मांडत आहेत. काल ता.6 ऑक्टोम्बर या दिवशी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पक्ष कोणाचा? चिन्ह कोणाचं याबाबत सुनावणी सुरू होती. यावेळी घडलेला प्रकार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सांगितला आहे.

काल सुनावणी दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने एकमेकांवर दावे प्रतीदावे केले होते. पक्ष हा आमचाच आहे असे अजित पवार गटाचे म्हणणे होते. तर पक्षाची स्थापना ही शरद पवारांनी केली. यामुळे पक्ष हा शरद पवारांचा आहे, असा वाद प्रतिवाद मांडण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील पक्षाचे प्रवक्ते जयंत पाटील नसल्याचं अजित पवार गटाने युक्तिवाद केला. सुनावणी ही 4 वाजता सुरू झाली आणि 6 वाजता संपली. सुनावणीनंतर जयंत पाटील म्हणाले की, जर मी प्रवक्ता नसेल तर अजित पवार गटातील आमदार हे खरे आमदार नाहीत. याचसह जयंत पाटलांसोबत जितेंद्र आव्हाडांनी भावनिक प्रतिसाद दिला आहे. यासह रोहित पवार यांनी अजित पवार गटातील बंड आमदारांना थेट इशारा दिला आहे.  तर आव्हाडांनी सुनावणी करत असतानाचा एक भावनिक किस्सा ट्वीट करत व्यक्त झाले आहेत.

हेही वाचा 

भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार, नाशिकमधील होर्डिंग्जवर यशवंतराव चव्हाणांचे फोटो

अजितदादांच्या ‘टोपी’ची हवा; जोडला अखंड महाराष्ट्र माझा !

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने मांडला युक्तिवाद; काय आहेत युक्तिवादाचे मुद्दे?

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना स्वत: निवडणूक आयोगामध्ये जाताना बघितलं. दुपारी 4 वाजता सुनावणी सुरु झाली संध्याकाळी 6 वाजता संपली. ते स्वत: तिथे बसून होते. त्यावेळेस त्यांच्या कानावर आणि आमच्या कानावरही शब्द आले. समोरच्या पक्षाकडील वकीलाने अत्यंत उद्धटपणाने ‘शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकुमशहा सारखा पक्ष चालवला’ हे ते वारंवार बोलत होते. हे ऐकल्यानंतर मात्र डोळ्यात अश्रू उभे राहीले. ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे. ज्यांच्यामुळे साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळं मिळालं त्यांनीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल अशी निवेदनं वकिलामार्फत करायला लावणं हे दुर्देवं आहे.” असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी