31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयखासदार ओमराजेंनी चाकू हाताने अडवला, अन् त्यांचे प्राण वाचले

खासदार ओमराजेंनी चाकू हाताने अडवला, अन् त्यांचे प्राण वाचले

लय भारी न्यजू नेटवर्क
उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरुणाने चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी चाकू हाताने अडवल्यामुळे ते बचावले. त्यांच्या हाताला दुखापत झाली. ही खळबळजनक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं घडली.

प्रचार सभेदरम्यान गर्दीचा फायदा घेत ओमराजे यांच्यावर एका तरूणाने हल्ला केला. हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्लेखोर ओमराजेंजवळ गेला. त्यावेळी त्याने चाकू काढला आणि ओमराजेंवर हल्ला केला. माथेफिरुने खासदार ओमराजेंवर तब्बल तीन वार केले. पवनराजेंच्या हातातील घड्याळावर चाकूचे वार बसले. घड्याळाच्या बाजूला हातावरही वार बसले. वार चुकल्यानंतर माथेफिरु पळून गेला. या चाकू हल्ल्यात ओमराजे यांच्या हाताला दुखापत झाली.

ओमराजे निंबाळकर यांच्यावर दिवसा ढवळ्या चाकूहल्ला झाला. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची काही वर्षापूर्वी अशीच हत्या झाली होती. ओमराजे निंबाळकर आणि भाजपमध्ये नुकतेच आलेले नेते पद्मसिंह पाटील घराण्याचे टोकाचे वैर आहे.
ओमराजे निंबाळकर 2019 मध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले. त्यांनी पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र राणा जगजीत सिंह पाटील यांचा पराभव केला होता. ओमराजे हे 2009 मध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यानंतर त्यांना शिवसेनेने 2019 मध्ये लोकसभेचं तिकीट दिले आणि ते निवडून आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी