31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमढ आयलंड येथील 830 बंगल्याचे बोगस नकाश्यांचा कोट्यवधींचा घोटाळा उघड

मढ आयलंड येथील 830 बंगल्याचे बोगस नकाश्यांचा कोट्यवधींचा घोटाळा उघड

टीम लय भारी

मुंबई- आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पश्चिम उपनगरातील मढ आयलंड येथील कोट्यवधी रुपयाच्या बोगस नकाशे आणि अनधिकृत बंगले बांधकामाच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. भूमि अभिलेख विभागाच्या १९६७ च्या मूळ नकाशांच्या बोगस प्रती तयार करुन पश्चिम उपनगरातील मढ आयलंड येथे नो-डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड आणि एनअे नियमांचे उल्लंघन करुन दुरुस्तीच्या नावाखाली धनाढ्यांनी नवीन बांधकामे केल्याबाबतच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा गेल्याचे देखील दरेकर यांनी सांगितले.( Madh Island Billions of bogus maps of 830 bungalows exposed)

या परिसरातील ८३० नकाशे बोगस असल्याचे उघड झाले असून विभागाच्या अधिकृत मूळ अभिलेखात छेडछाड करुन खोट्या नोंदी नोंदवून राज्य सरकार तसेच उच्च न्यायालयाची व मूळ जमीनधारकांची सुनियोजित फसवणूक करण्यात आल्याचेही दरेकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले.

नितेश राणे यांचे उखळ पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही- खासदार विनायक राऊत

तर महाराष्ट्रातील मंदिरं पुन्हा बंद होऊ शकतात; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांकडून इशारा

या प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमून तातडीने सखोल चौकशी करावी तसेच संबंधित उपअधीक्षक, भूमिअभिलेख व पालिकेचे वॉर्ड ऑफिसरच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी केली.

भूमि अभिलेख कार्यालय, मुंबई महानगरपालिका व धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीने संगनमत करुन 830 बंगल्याचे बोगस नकाशे तयार केले. यामधून कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या उप अधीक्षक, भूमी अभिलेख, अनधिकृत बंगल्यांना सोयीसुविधा देणारे मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीसांना फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी समन्स

Explained: Elections in key states in year of reckoning for BJP and Opposition

भूमि अभिलेख कार्यालय, मुंबई महानगरपालिका व धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीने संगनमत करुन ८३० बंगल्याचे बोगस नकाशे तयार केले. यामधून कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या उप अधीक्षक, भूमी अभिलेख, अनधिकृत बंगल्यांना सोयीसुविधा देणारे मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दरेकरांशी सहमती व्यक्त करुन बोगस नकाशांच्या आधारे १०२ अनधिकृत बंगले बांधले गेल्याचे आपल्या उत्तरात कबूल केले.  त्यामुळे या गंभीर प्रकरणाची जमावबंदी आयुक्तांमार्फत १ महिन्याच्या आत चौकशी करुन या प्रकरणी जे जबाबदार आहेत, त्या संबंधित दोषींविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही महसुल मंत्री थोरात यांनी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी