31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमहुआ मोईत्रांचा मोबाईल हॅक; कारण आले समोर

महुआ मोईत्रांचा मोबाईल हॅक; कारण आले समोर

अॅप्पल कंपनीच्या मोबाईल वापराबाबत भारताची जगभरात चर्चा आहे. या कंपनीचे मुख्यालय हे युएसएमध्ये आहे, इतर मोबाईल कंपन्यांच्या तुलनेत आयफोनचे दर हे खर्चिक आहेत. हा फोन त्याच्या फिचर्ससाठी अधिक ओळखला जात असून आपली वैयक्तिक माहिती, सुरक्षित ठेवण्यासाठी अॅप्पल मोबईल हा महत्वाचा पर्याय आहे. यामुळे भारतातील अधिकाधिक राजकीय नेते आणि उद्योजक याच मोबाईलचा वापर करतात. आतापर्यंत आपण अनेक मोबाईल हॅक झाल्याबाबत ऐकले असेलच. मात्र आता अॅप्पलसारख्या महागड्या आणि ब्रॅंडेड मोबाईलचे हॅकींग भारतात सुरू आहे.  तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा अॅप्पल मोबाईल हॅक झाल्याची माहीती समोर आली आहे.

महुआ मोईत्रा या कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. काही दिवसांआधी त्यांच्यावर हिरानंदानी ग्रुपचे सीईओ हिरानंदानी यांच्याकडून पैसे,महागड्या भेटवस्तू मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता त्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आल्या. त्यांच्या अॅप्पल कंपनीचा मोबाईल हॅक केल्याची माहिती आता समोर आली आहे. यामागे राजकीय सूड उगवण्याचे काम कोणी तरी करत आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी मोईत्रांवर आरोप केले आहेत. मोबाईल हॅक करणे हे एक निमित्त असून यामागे भाजपचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. मोईत्राच नाही तर याआधी अनेक नेत्यांचे मोबाईल हॅक करण्यात आले होते.

हे ही वाचा

राज ठाकरेंचे जरांगे पाटलांना पत्र, उपोषण सोडण्याची केली विनंती

कुणबी मराठा नोंदी सापडलेल्यांना मिळणार कुणबी मराठा प्रमाणपत्र; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीवर धोनीचे सूचक विधान

भारतातील इंडीया आघडींच्या प्रमुख नेत्यांचे फोन हॅक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. माहुआ मोईत्रांव्यतिरीक्त पवन खेडा, प्रियांका चतुर्वेदी, शशी थरूर, सीताराम येचुरी, राघव चड्डा यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी अजून कोण-कोणते उद्योग केले जातील? असा सवाल करत जितेंद्र आव्हाडांनी आपले मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

अॅप्पल फोन हॅक होऊ शकत नाही असं नेहमी म्हटलं जायचं. पण, अॅप्पल ने काही नेत्यांना ईमेलद्वारे कळवले आहे की, तुमचा अॅप्पल फोन हॅक केला गेला आहे आणि तसे त्यांनी सरकार पुरस्कृत आहे असे देखिल म्हटले आहे. म्हणजे आपण काय बोलतो काय ऐकतो. आपल्या फोनमध्ये कोणते फोटो आहेत याची माहिती सरकारला हवी आहे. महुआ मोईत्रांच्या बाबतीत जे घडतयं ते हॅकींगमुळेच झालं हे आता स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी अजून कोण-कोणते उद्योग केले जातील हे देव जाणे. जगामध्ये हॅकींग हा सर्वात मोठा गुन्हा धरला जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी