31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी- मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी- मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपयशी ठरलेली मंडळी आता मराठा समाजाला भडकावण्याचे काम करत आहे. उद्धव ठाकरे हे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत. मराठा समाजाबद्दल बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला नव्हते. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली. त्यामुळे मराठा आरक्षण मुद्द्यावर या दोघांमध्ये येत्या काळात तू तू मै मै होणार आहे.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला नव्हते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रश्न सोडून दुसऱ्या राज्यात भाजपच्या प्रचारास गेले होते. रायपूरमध्ये ते निवडणुकीचा प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांना राज्य आणि राज्यातील प्रश्न किती महत्वाचे आहे? हे दिसून येत असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आरक्षणासाठी दिल्लीत दबाब गट तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी वेळ पडल्यास महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा,’ असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली.

राज्यात दोन दिवसापासून मराठा आंदोलन आक्रमक बनत आहे. मराठवाड्यात दोन आजी आमदार आणि एका माजी आमदाराचे घर पेटवून देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी भवन पेटवून टाकले. अनेक सरकारी वाहनांना लक्ष्य करण्यात आले आहे. आमदार आणि खासदार मंडळींनी राजीनामे दिले आहेत. बीड आणि धारशिव जिल्ह्यात संचारबंदी आहे. एकुणात राज्यात मराठा आंदोलन तेजीत सुरू आहे. असे असताना, सरकारला हे आंदोलन व्यवस्थित हाताळण्यात आले नाही. अशी टीका विरोधक करत आहे. या सगळ्या घडामोडीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाबाबत भूमिका सांगितली.

मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना देखील भेटण्याची तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे. जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. जर एवढे करून देखील पंतप्रधानवर परिणाम होणार नसेल तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी