30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रकुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? औद्योगिक गुंतवणुकीत राज्य पाचव्या स्थानी, गुजरात अव्वल

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? औद्योगिक गुंतवणुकीत राज्य पाचव्या स्थानी, गुजरात अव्वल

सरकार गतिमान, निर्णय वेगवान… अशी टॅगलाईन घेऊन टिमकी वाजवणाऱ्या राज्य सरकारची मान लाजेने खाली जाईल अशी माहिती समोर आली आहे. देशात सगळ्याच बाबतीत अग्रेसर अशी राज्याची ओळख होती. पण राज्यातून फॉक्सकॉन प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन राज्याबाहेर गेले. वेदांता फॉक्सकॉन हा सेमिकंडक्टरचा प्रकल्प होता, तर फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल संबंधित होता. शिवाय रायगडात एक बल्क इंडस्ट्री येणार होती. या तिन्ही प्रकल्पातून काही लाख रोजगार राज्यात उपलब्ध होणार होते. पण केंद्रातील सरकारने यातील दोन प्रकल्प गुजरातला पळवले. आता सर्वोच्च औद्योगिक गुंतवणुकीचा ऑक्टोबर 2023 चा अहवाल आला असून यात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर फेकला गेला असून गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे.

राज्यातून फॉक्सकॉन प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला. शिवाय रायगडात एक बल्क इंडस्ट्री येणार होती. या तिन्ही प्रकल्पातून काही लाख रोजगार राज्यात उपलब्ध होणार होते. पण केंद्र सरकारने यातील दोन प्रकल्प गुजरातला पळवले. तिसरा प्रकल्प विविध कारणामुळे पूर्ण होऊ शकला नाही.

असे चित्र असताना आता सर्वोच्च औद्योगिक गुंतवणुकीचा ऑक्टोबर 2023 चा अहवाल आला असून यात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर फेकला गेला असून गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्य सरकारला  सगळ्या बाजूने अपयश येत असताना ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून जनतेत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेला भुलवणाऱ्या घोषणांचे दळण दळले जात आहे. असे असताना एकेकाळी औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असणारे राज्य आता पिछाडीवर जात आहे. हे सरकारच्या औद्योगिक धोरणांचे अपयश मानण्यात येते.

आंध्र प्रदेश, उत्तराखंड, तमिळनाडू गुंतवणुकीत राज्याच्या पुढे 

या अहवालानुसार, ऑक्टोबर 2023 पर्यंत गुजरात राज्यात 25, 685 कोटी, आंध्र प्रदेश 19, 187 कोटी, उत्तराखंड 10, 150 कोटी, तमिळनाडू 7,750 कोटी आणि महाराष्ट्र 5,511 कोटी सर्वोच्च औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्र हे देशात प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. विविध क्षेत्रात राज्याचे नाव आहे. असे असताना केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून कामगार विरोधी धोरणे  घेतलेली आहेत. शिवाय राज्यासाठी येऊ घातलेले मोठमोठे प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यात जात आहेत.

मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे मनसुबे केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे आहेत. पण राज्यातील सजग जनता, तत्कालीन राजकीय पक्ष, चळवळी यांच्यामुळे ही स्वप्ने हवेत विरली. असे सगळे काही असताना केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी मुंबईतील विविध उद्योग गुजरातला तर पळवले, शिवाय नुकताच हिऱ्यांचा  बाजार गुजरातला हलवला.

हे सुद्धा वाचा 

भारत आणि श्रीलंका सामन्यापूर्वीच भारताच्या डोकेदुखीत वाढ
मराठा आरक्षणाच्या लढाईत बॉलिवूडची उडी
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या तयारीला लागा

राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. विशेषतः राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यावर ते केंद्राच्या तालावर नाचतात, असा विरोधक आरोप करत आहेत. केंद्राच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार कधीही राज्याच्या भल्याचा विचार करत नाही, अशी राज्यातील विरोधकांची ओरड आहे. औद्योगिक गुंतवणुकीबाबतचा अहवाल इंडियन टेक अँड इन्फ्रा या वेब पोर्टलने प्रसिद्ध केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी