32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रसांगलीतील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे...

सांगलीतील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला.त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. असे असताना खरीप हंगाम २०२३ साठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व तासगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी माहिती विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली. ‘सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व तासगाव हे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओळखले जातात.तरी सुद्धा सदर तालुक्यांचा TRIGER-२ मध्ये समावेश नाही.’ ही बाबही पडळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली आहे.

राज्यातील दुष्काळाचे मूल्यांकन सरकारने खरीप हंगाम २०२३ मध्ये MAHA-MADAT या प्रणालीद्वारे केले आहे. त्यानुसार राज्यातील ४२ तालुक्यांचा TRIGER- २ मध्ये समावेश केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व तासगाव हे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओळखले जातात.

MAHA-MADAT या प्रणालीद्वारे केलेले दुष्काळाचे मूल्यांकन हे चुकीचे असून आटपाडी तालुक्यात एकूण पावसाच्या १२० दिवसापैकी ८५ दिवस पाऊस पडलेला नाही, जत तालुक्यात एकूण पावसाच्या १२० दिवसापैकी ७६ दिवस पाऊस पडलेला नाही, कवठेमहांकाळ तालुक्यात एकूण पावसाच्या १२० दिवसापैकी ७६ दिवस पाऊस पडलेला नाही, तासगाव तालुक्यात एकूण पावसाच्या १२० दिवसापैकी ५५ दिवस पाऊस पडलेला नाही तरी सुद्धा सदर तालुक्यांचा TRIGER-२ मध्ये समावेश नाही. ही बाब पडळकर यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली.

दि. २९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली. भूवैज्ञानिक यांच्या मार्फत भूजल सर्वेक्षण करून सदर तालुक्यांचा TRIGER-२ मध्ये समावेश करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपल्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तरी या चारही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे वस्तुस्थितीचा विचार करून सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व तासगाव या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी विनंती पडळकर यांनी केली.

दरम्यान, राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केले. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले होते.

मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा 

शहाजी बापूंचा काय माज, काय मस्ती एकदम ओकेच

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? औद्योगिक गुंतवणुकीत राज्य पाचव्या स्थानी, गुजरात अव्वल

आरोग्य सेविकांसाठी मंत्री तानाजी सावंतांकडून गोड भेट !

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी