30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या बैठकीच्या वाटेत अडचणींचे काटे; एमईटीच्या ट्रस्टीचा विरोध

अजित पवारांच्या बैठकीच्या वाटेत अडचणींचे काटे; एमईटीच्या ट्रस्टीचा विरोध

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले असले तरी त्यांच्या समोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यावर ते प्रथमच बुधवारी बांद्रा येथे एमईटीमध्ये आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांच्याशी 11 वाजता संपर्क साधणार आहे. अजित पवारांच्या बैठकीला एमईटीचे ट्रस्टी सुनिल कर्वे यांनी विरोध केला आहे.

धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून एमईटीच्या जागेवर राजकीय बैठका होऊ नये म्हणून पत्र लिहिलं आहे. एमईटीचे ट्रस्टी सुनिल कर्वे यांनी एमईटीमध्ये होणाऱ्या अजित पवार यांच्या या बैठकीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. शैक्षणिक ठिकाणी राजकीय बैठका नकोच. छगन भुजबळ यांनी येथे कायम अशा बैठका घेतल्या आहेत. एमईटीचा पाहिजे तसा वापर केला जातो, यामुळे जे नुकसान होतं त्याला कोण जबाबदार ? असा सवाल सुनिल कर्वे यांनी उपस्थित केला.

छगन भुजबळ यांनी येथे 10 व्या माळ्यावर बंगला तयार केला आहे. फर्नीचर तयार केलेय. तेलगीच्या स्कॅमपासून सर्व तिथे चालले आहे. संस्थेत काम केलय, त्यांनी ही याला विरोध केला आहे, असे कर्वे म्हणाले. एमईटीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ही शैक्षणिक संस्था आहे, याचं पावित्र राखायला हवं. धर्मादाय आयुक्त हे थांबवू शकतात, असे कर्वे यांनी सांगितलं. मी जर त्या कर्मचा-यांसोबत बैठक घेतली तर त्यांच्यावर ते कारवाई करतील. विरोध करणाऱ्या कर्मचा-यांविरोधात कारवाई करतील, असेही कर्वे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचे अजित पवारांना खडेबोल

शरद पवारांनी सांगून देखील अजित पवारांनी ऐकले नाही

सई मांजरेकरचा डिस्को डान्सा… फोटो पाहून चाहते घायाळ

अजित पवार आणि शरद पवार यांनी 5 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे अजित पवार की शरद पवार असा पेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.. अजित पवार यांनी एमईटी वांद्रे येथे आमदार, खासदार, जिल्हाअध्यक्ष यांच्यासह सर्वच पदाधिकाराऱ्यांना बोलवले आहे. तर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक बोलवली आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी