33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयमनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

टीम लय भारी

मुंबई : रविवार, ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांसाठी मुंबई लोकलचे दरवाजे खुले आहेत. मनसेने यासाठी अनेकदा राज्यसरकारकडे मागणी केली होती. ती मागणी आता पूर्ण झाल्याने मनसेने ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत (MNS tweeted thanking the Chief Minister).

दोन लस मात्रा घेतलेल्या सामान्य नागरिकांसाठी मुंबई लोकल सुरू करण्यासाठी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्याच प्रमाणे मनसेचे नेते सुद्धा सतत हा विषय ट्विटरच्या माध्यमातून राज्यसरकारच्या दृष्टीस आणून देत होते. राज्य सरकारने याची दखल घेतली आणि ही मागणी मान्य केली त्यामुळे मनसेच्या अधिकृत ट्विटर वरून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे (The MNS has thanked the Chief Minister on its official Twitter account).

‘मुंबईचे लोकलप्रवाशी शिवपंख लावणार, अन् कामावर उडत उडत जाणार’, मनसेने सांगितले भाकीत

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना 15 ऑगस्ट पासून मिळणार उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा

मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसेच मुंबईचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्र घेतल्या आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी. अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसींच्या दोन मात्र घेतलेल्यांना 15 ऑगस्ट पासून लोकल प्रवास सुरू करता येईल अशी घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करीत आहे. अश्या प्रकारचे ट्विट त्यांनी केले आहे.

छोट्या पडद्यावर खलनायक साकारणाऱ्या अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे निधन

Maharashtra allows travel in local train from Aug 15 to those fully vaccinated

MNS tweeted thanking the Chief Minister
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे

दोन लस मात्र घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना या सेवेचा फायदा घेता येणार आहे. त्यांचा प्रवास नीट व्हावा यासाठी राज्यसरकार द्वारा एक ॲप विकसित करण्यात आला आहे. नागरिकांना या ॲप वर जाऊन, नमूद केलेली माहिती भरायची आहे. त्यानंतर त्यांना लोकल प्रवासासाठी पास मिळेल. ज्यांना ऑनलाईन पास मिळवणे शक्य होणार नाही अश्या लोकांसाठी महानगर पालिकेच्या विभागीय कार्यालयात ऑफलाईन पास मिळवण्याची देखील सोय करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी