30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रमोहित कंबोजने राखी सावंतसोबत केली सुषमा अंधारेंची तुलना

मोहित कंबोजने राखी सावंतसोबत केली सुषमा अंधारेंची तुलना

राज्यात काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात सावळा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांआधी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणाबाबत सरकारमधील दोन मंत्र्यांच्या नार्कोटेस्ट करा, अशी मागणी केली होती. दरम्यान १७ ऑक्टोबरला ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक करण्यात आली. यावर राज्याचे  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची तोंडं बंद करणार, असे वक्तव्य केले होते. यावर सुषमा अंधारेंनी यांनी, तोंड बंद करणार म्हणजे काय करणार? मारणार की मलिक, देशमुख, राऊतांसारखे अडकवणार? असा प्रतिसवाल केला. यामुळे आता सुषमा अंधारे सर्वाधिक चर्चेत आहेत. फडणवीस यांच्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनीही सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. तोही एकदा नव्हे तर सलग दुसऱ्या दिवशीही.

सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या असून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर भाजपचे कान टोचत आहेत. यावरून आता भाजप वारंवार अंधारेंना टार्गेट करत आहे. फडणवीसांनी सगळ्यांची थोबाडं बंद होतील, असे वक्तव्य केले होते यावर अंधारेंनी धमकी समजायची काय असा सवाल केला. अशातच काल (२० ऑक्टोबर) भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ‘सुषमा अंधारे का भी जल्द महुआ मोइत्रा होगा !’ असे ट्वीट केले होते.

अंधारेंचे प्रत्युत्तर

मोहित यांनी केलेल्या ट्वीटला प्रत्युत्तर देत अंधारेंनी ट्वीट करत महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राच्या बहिण-लेकीना बिनधास्तपणे धमकावण्याची हिम्मत देवेंद्रजी आपल्या आशीर्वादामुळे येते. मी फडणवीस साहेबांची आभारी आहे.” अशी टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर मोहित कंबोज यांनी सुषमा आंधरेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात भाजप नेते महिलांचा अनादर करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

 

हेही वाचा

‘इस्रो’नं पुन्हा करून दाखवलं, ‘गगनयान’ची पहिली चाचणी यशस्वी

आई-वडिलांसाठी ‘तो’ बनला पोलिस

कंत्राटी भरतीप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा करारा जवाब

कोण मोठी अभिनेत्री?

या प्रकरणाला इथेच पूर्णविराम मिळेल, असे वाटत होते, मात्र मोहित कंबोज थांबायचे नाव घेत नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा अंधारेंबाबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एका बाजूला अभिनेत्री राखी सावंत आणि दुसऱ्या बाजूला सुषणा अंधारें रडत असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसाठी त्यांनी या दोघांमधील कोणती अभिनेत्री मोठी आहे? असा सवाल केला आहे. अंधारे यांना ट्रोल करण्यासाठी नेटकऱ्यांना आवाहन करत आहेत. म्हणून त्यांनी ट्रोलर्स आर वेलकम असे  कॅप्शन देखील दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी