28 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरक्राईमड्रगमाफिया ललित पाटीलच्या 'बारा' भानगडी

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या ‘बारा’ भानगडी

ड्रगमाफिया ललित पाटील याचे अनेक कारनामे आता पुढे येत आहेत. ललित पाटील याने नाशिकमध्ये चक्क ड्रग्जची फॅक्टरी उभारली. त्यासाठी त्याला कुणी कायदेशीर सल्ला दिला, त्याने ड्रग्ज वितरणाची साखळी कशी उभारली, याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे. एवढेच नाही तर ललितला सर्व प्रकारे मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण आहेत, यांचीही नावे समोर आलीत. हे कमी म्हणून की काय ललित पाटील दर महिन्याला किती नफा कमवायचा हे कळले तर तुमचे डोळे फिरतील. ललित पाटील एवढे काळे धंदे करायचा हे त्याच्या आईवडिलांना बहुधा ठावूक नव्हते. त्यामुळेच त्याला अटक झाल्यानंतर त्यांने असा एवढा कोणता गुन्हा केलाय, अशी प्रतिक्रिया ते देत होते.

‘गोलू’ पुणे पोलिसांना काय सांगणार?

ललित पाटीलची ड्रग्जची फॅक्टरी उभारण्यापासून ड्रग्ज रॅकेटपर्यंत रेहान शेख अन्सारी ऊर्फ गोलू याने मोठी भूमिका बजावली आहे. याच गोलूला २० ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली होती. त्याचा ताबा आता पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे ललित पाटीलच्या ड्रग्जच्या धंद्यातील अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे. नाशिकमधील शिंदे गावात ड्रग्जची फॅक्टरी उभारण्यात रेहानने खूप मदत केली होती. त्यानंतर ड्रग्जची कशी विक्री करायची, त्यातून किती पैसे मिळणार, हे गणित तोच सांभाळायचा.

अर्चना आणि प्रज्ञा कोण आहेत?

ललित पाटीलचे अर्चना निकम आणि प्रज्ञा कांबळे या दोन महिलांचे संबंध जोडले जात आहेत. ससूनमधून पळाल्यानंतर ललितने अर्चनाच्या पंचवटीमधील घरी मुक्काम केला होता. अर्चनाने त्याला २५ लाख रुपये दिल्यानंतर ललित पाटीलने पुढचा प्रवास केला. नाशिकच्या पंचवटीत २०१७ मध्ये टोळीयुद्धातून किरण निकम याचा खून झाला होता. अर्चना याच किरण निकमची पत्नी असून तिचेही नाव गुन्हेगारी जगात घेतले जाते.

तर प्रज्ञा कांबळे या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणात ललितची कायदेशीर सल्लागार असल्याची माहिती पुढे येत आहे. ती वकील असून तिचे अनेक वर्षांपासून ललितसोबत संबंध आहेत. ललित आणि त्याच्या साथीदारांना तिने अनेकदा न्याय प्रक्रियेत मदत केली आहे. शिंदे गावात ड्रग्जची फॅक्टरी तिच्याच सांगण्यावरून उभारल्याचे सांगितले जाते. ससून रुग्णालयातून पळाल्यावर ललित प्रज्ञाबरोबर एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी होता. त्यानंतर तो नाशिकला गेला होता.

दर महिना ५० लाखांची कमाई

ललित पाटीलला ड्रग्ज फॅक्टरीतून दर महिन्याला ५० लाखांहून अधिक नफा मिळायचा, अशी माहिती मिळते. शिंदे गावात त्यांने २०२१ मध्ये ड्रग्जची फॅक्टरी सुरू केली. तेव्हापासून ललित पाटील आणि भूषण पाटील हे बंधू अक्षरश: खोऱ्याने पैसा ओढत होते.

ड्रग्ज विक्रीचे आंतरराष्ट्रीय जाळे?

नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरीतून मध्य प्रदेश, गुजरात, राज्यस्थान, छत्तीसगड, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. देशात जसे ड्रग्ज विक्रीचे जाळे होते तसेच देशाबाहेर होते काय, याचा तपास पोलीस करत आहेत. बंगळुरूमधून चेन्नईत जाऊन ललित पाटील श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती मिळते. त्यातून त्याच्या ड्रग्जचे जाळे इतर देशांत होते, असाही एक अंदाज आहे.

हे ही वाचा

नाशिक ड्रग्ज प्रकरण: आठ किलो सोन्याची खरेदी करणारा ‘तो’ कोण?

आई-वडिलांसाठी ‘तो’ बनला पोलिस

‘इस्रो’नं पुन्हा करून दाखवलं, ‘गगनयान’ची पहिली चाचणी यशस्वी

अटक, फरार आणि पुन्हा अटक

ड्रगमाफिया ललित पाटील याला २०२० मध्ये अटक झाली होती. तेव्हापासून वैद्यकीय कारण सांगत म्हणजे २०२० पासून पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल होता. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी तो फरार झाला आणि मुंबई पोलिसांनी १७ ऑक्टोबरला त्याला चेन्नईला पळण्याच्या प्रयत्नात असताना बंगळुरूमधून अटक केली. तब्बल १५ दिवस पोलिसांना गुंगारा देणार ललित या कालावधीत नाशिक, इंदूर, सूरत, धुळे, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी लपला होता. त्यानंतर तो बंगळुरूला गेला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी