27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयखासदार हरवल्या आहेत, शिवसेनेकडून भाजप विरुद्ध बॅनरबाजी

खासदार हरवल्या आहेत, शिवसेनेकडून भाजप विरुद्ध बॅनरबाजी

टीम लय भारी

मुंबई:-  उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या खासदार पुनम महाजन हरवल्या आहेत अशी बॅनरबाजी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या जवळ असतानाच भाजप शिनसेनेतील मुंबईतील संघर्ष वाढताना दिसतोय.( MPs have lost, Shiv Sena is waving banners against BJP)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्राच्या आधार घेत भाजपवर टीका केली होती. त्यानंतर भाजप खासदार यांनी बाळासाहेब ठाकरे आणि भाजपने हिंदुत्वासाठी युती केली होती.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंचा मोठा निर्णय, न्यायालयासमोर शरण जाणार

संजय राऊतांचे पूनम महाजनांना प्रत्युत्तर, दु:ख वाटून घेण्याची गरज नाही

नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली, पोलीस आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

नामर्दासारखे असे व्यंगचित्र टाकू नका ,अशी टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून पुन्हा टीका करण्यात येत आहे. महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार या बॅनरबाजीतून घेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पुनम महाजन यांनी २०१९ ची निवडणूक विजयी झाल्या तर या अदोगरच्या २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस खासदार प्रिया दत्त यांचा १ लाखाच्या मताधिक्यांने पराभव केला होता. प्रिया दत्त यांचा जनतेची संपर्क आणि काँग्रसच्या स्थानिक नेत्यांमधील फूट या बाबी त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या होत्या.

संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेकडून पुनम महाजन त्यांनी केलेल्या कामाबाबत आणि विकास कामांबाबत प्रश्न विचारत आहेत. यावर पुनम महाजन आणि भाजप काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी