30 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeराजकीयठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भिडले एकटे मुकेश शहाणे ; पोलिसात गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भिडले एकटे मुकेश शहाणे ; पोलिसात गुन्हा दाखल

महायुतीची प्रचार रॅली महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात आली आणि दोन्ही बाजूने घोषणांची आतषबाजी झाल्याचे बघायला मिळाले. पन्नास खोके एकदम ओके ला उत्तर देत भाजपचे माजी नगरसेवक थेट जनसंपर्क कार्यालयात घुसले आणि वातावरण चांगलेच तापले. दरम्यान मुकेश शहाणे महाविकास आघाडीच्या फिर्यादीवरून श्री. शहाणे यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महायुतीची प्रचार रॅली महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात आली आणि दोन्ही बाजूने घोषणांची आतषबाजी झाल्याचे बघायला मिळाले. पन्नास खोके एकदम ओके ला उत्तर देत भाजपचे माजी नगरसेवक थेट जनसंपर्क कार्यालयात घुसले आणि वातावरण चांगलेच तापले. दरम्यान मुकेश शहाणे (Mukesh Shahane) महाविकास आघाडीच्या फिर्यादीवरून श्री. शहाणे (Mukesh Shahane) यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Mukesh Shahane alone confronts Thackeray group workers Case registered with the police)

गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील चांगले राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्री, चित्रा वाघ, गिरीश महाजन, बावनकुळे, संजय राऊत, सुषमा अंधारे, आ. रोहित पवार, बानगुडे पाटील आदींचे दौरे आता चांगलेच वाढू लागले आहेत. सभा व प्रचार रॅलीच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगताना बघायला मिळत आहे.

दरम्यान सोमवारी सिडकोत महायुतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तम नगर येथील भोळे मंगल कार्यालया जवळील संपर्क कार्याजवळ पोहोचली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महाविकास आघां आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात मशाली घेऊन शंभर खोके एकदम ओके च्या घोषणा देत महायुतीच्या उमेदवारांना दाखवत खुन्नस दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांनी प्रचार रॅलीवरून खाली उतरत थेट महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयात धाव घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश उघडे यांच्या हातातील मशाल खाली पडली आणि वातावरण चांगलेच तापले. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला. शहाणे यांनी गर्भित इशारा देत पुढे आपल्या वाहनातून प्रचार रॅलीत सहभागी झाले. सदर घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या कानावर सदर प्रकाराचे कथन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तब्बल चार तासानंतर भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे नाशिक शहरात महाविकास आघाडी व महायुतीतील राजकीय वातावरण चांगले तापले असून पुढील पाच दिवसात आणखी बरेच काही बघायला मिळणार हे या घटने वरून स्पष्ट होत आहे.

भोळे मंगल कार्यालय : पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा देताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते

२. महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयात पदाधिकारी व मुकेश शहाणे यांच्यात सुरू असलेली बाचाबाची

सोमवारी महायुतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावता नगर येथील महायुतीच्या कार्यालयाजवळ एका कार्यकर्त्यांने अश्लील हावभाव केले. नंतर उत्तम नगर येथील त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने मुद्दामहुन खुन्नस दिली. भोळे मंगल कार्यालयाजवळ त्यांच्या पदाधिकाऱ्यनी घोषणा देत डिवचले. तर काहींनी अश्लील हावभाव केले. यावेळी आमच्याबरोबर काही महिला पदाधिकारी देखील होत्या. त्याचा जाब विचारण्यासाठी मी तेथे गेलो. यात काही वावगे नाही. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा सूड बुद्धीचा आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो.
मुकेश शहाणे, माजी नगरसेवक, भाजपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी