27 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरराजकीय'मुंबईकरांना प्रदूषणमुक्त राहण्याचा अधिकार आहे की नाही'?

‘मुंबईकरांना प्रदूषणमुक्त राहण्याचा अधिकार आहे की नाही’?

देशाची अर्थिक राजधानी मुंबई असून या शहराचे नाव केवळ भारतातच नाही तर जगभरात या शहराचा डंका वाजतो. याठिकाणी देशातून, जगातून अनेक लोकं रोजगाराच्या शोधार्थ येत असतात. या शहरात वाढते स्थलांतरण होत असून तितकेच प्रदूषणही होत आहे. रस्त्याच्या वाढत्या समस्यांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. तर मुंबईला समुद्रकीनारा असल्याने जलप्रदूषणही (Mumbai Polution) होते. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम हा प्रदूषणावर दिसून येतो मात्र, नेते याकडे दूर्लक्ष करत आहेत. मुंबई महापालिकेचा (BMC) जीडीपी (GDP) हा दिल्लीहूनही अधिक आहे. मात्र मुंबई प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने प्रदूषण समस्येवर निराकरण करण्याकडे सरकार अपयशी ठरत असल्याचा दावा विरोधकांनी मुंबई प्रशासनावर केला.

या मुद्दयाला धरून कॉंग्रेस पक्षाचे नेते नाना पटोलेंनी (Nana Ptole) प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यात मुंबईच्या प्रदूषणावरून चांगलीच जुंपली होती. तर प्रदूषणाच्याबाबतीत मुंबई अव्वल असल्याचा दावा शेलारांनी केला आहे. दरम्यान, आता नाना पटोलेंनी प्रदूषणाबाबत आपले मत मांडले आहे. पटोले म्हणाले की, मुंबईतील प्रदूषण वाढू लागले आहे. महानगरपालिकेचे वार्षिक बजेट हे ५२,००० कोटी आहे. मात्र यातून थोडासा का होईना खर्च प्रदूषण कमी करण्यासाठी करता आला नाही.

हे ही वाचा

प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची भेट

मराठ्यांचे वाटोळे करणारे ‘ते’ कोण? २४ डिसेंबरला जरांगे-पाटील नावे जाहीर करणार

जाणून घ्या नरक चतुर्दशीचे महत्व…

काय म्हणाले नाना पटोले?

मुंबईत प्रदूषण अधिक वाढले असून यावर महापालिका आणि भाजपकडे प्रदूषण कमी करण्यासाठी कोणतीही उपायोजना नाही का? असा थेट सवाल केला आहे. मुंबईच्या ५२,००० कोटी रूपयांच्या बजेटपैकी थोडासा खर्च मुंबईच्या प्रदूषणावर करा. यासोबत त्यांनी सरकारलाही धारेवर धरले आहे. ते म्हणाले आहेत की, सरकारला मुंबईचे आरोग्य महत्वाचे वाटत नाही का? मुंबईकरांना प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचा आधिकार नाही का? असा सवाल आता पटोलेंनी केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी