28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयप्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची भेट

प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची भेट

राज्यात राष्ट्रवादीसोबत बंड करून आपल्या ८ आमदारांसह अजित पवारांनी शिंदे गट आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतरही अजित पवार (Ajit Pawar) अनेकदा शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र शरद पवार (Sharad Pawar) आपल्या मतावर ठाम असून त्यांनी अजित पवार आणि इतर आमदारांचे काही ऐकले नाही. तर काही दिवसांपूर्वी काका-पूतणे अजित पवारांच्या वडीलांचे नाव दिलेल्या शाळेत उद्घाटनासाठी आले होते. मात्र यावेळी शरद पवारांनी केवळ रिबीन कापून उद्घाटन केले. पण त्यांनी यावेळी दीप प्रज्वलन करण्यासाठी नकार देत अजित पवारांकडे हात दाखवला. यामुळे आता हा वाद नात्यांमध्ये पोहोचला आहे. तर (१० नोव्हेंबर) दिवशी शरद पवार आणि अजित पवार हे दोघे पुन्हा एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून अजित पवारांना डेंग्यू झाला असल्याने ही भावनिक भेट असल्याची चर्चा आहे. (Latest News)

राज्यात फोडा आणि राज्य करा ही निती भाजपने अवलंबली आहे. यामुळे एकाच पक्षातले, एका रक्ताच्या नात्यातले वैरी होऊ लागले आहेत. असे असले तरीही दिवाळीचे औचित्य साधून शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवारांच्या बाणेर येथील घरी सर्व पवार कुटुंबीयांची भेट झाली. यावेळी शरद पवार आणि अजित पवारांची देखील भेट झाली. दरवर्षी दिवाळी सणात पवार कुटुंबीय भेटत असतात, मात्र यंदा राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने किमान कौटुंबिक भेट होईल का? असा सवाल होता. मात्र कौटुंबिक भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता सुप्रिया सुळेंनी राजकीय मतभेद असले तरी आमच्यात वैयक्तिक दुरावा कधीच नसल्याचे वक्तव्य केले आहे. दरवर्षी दिवाळीत बारामतीला सगळं कुटुंब जमते, परंतु प्रतापराव पवार यांच्या पत्नीची तब्येत खराब असल्याने त्यांचे कुटुंब बारामतीला येणार नाही. त्यामुळे काकीची तब्येत पाहता आम्ही विशेष सोहळा आज इथं ठेवला होता.

हे ही वाचा

नवी मुंबईकरांवर किती अन्याय करणार?

राज ठाकरेंवरील तडीपारीचा गुन्हा रद्द

लहानग्यांनाही रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचे आकर्षण

शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीत काय घडल?

काका-पुतणे एकत्र आल्यानंतर दोघांच्यात काय चर्चा झाली? हे राज्यातील जनतेला पडलेला एक मोठा प्रश्न आहे. याबाबतची माहिती शरद पवारांच्या बहिणीने दिली आहे. दोघांच्या भेटीदरम्यान कौटुंबिक चर्चा झाल्या. यानिमित्ताने अनेक भावंड एकत्र जमलो. तर यावेळी अजित पवारांनी जेवन झाल्यानंतर दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीला जाण्यामागचे कारण समोर आले आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावरती सुरू असलेली परिस्थीती आटोक्यात कशी आणता येईल? याची चर्चा अमित शहांसोबत करणार असल्याचे सांगितले आहे.

काका-पुतण्यांच्या भेटीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशादध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया द्ली आहे. पवार कुटुंबीयांनी काय करावे हे त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल मी काय बोलणार?  मी पार्टीचा प्रदेशाद्यक्ष आहे. पार्टीबद्दल असेल तर बोला, कोणी कोणाला बेटावे याबद्दल मी काय बोलू, असे जयंत पाटील म्हणाले आहेत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी