28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजन...अन् प्राजक्ता माळीला देव पावला!

…अन् प्राजक्ता माळीला देव पावला!

प्राजक्ता माळीला (Prajakta Mali) अखेर देव पावला. काही दिवसांपूर्वी तिने १२ ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. तसेच आंबोजोगाईला योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी प्राजक्ता माळी आता अध्यात्मात तर रमणार नाही ना, असा प्रश्न तिचे चाहते विचारत होते. मात्र, आता असं कळलंय की, तिने देवीकडे काही वेगळंच मागितलं होतं. आणि तिची इच्छा लगेचच पूर्ण झाली आहे. कारण नुकताच प्राजक्ता माळीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत:चा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्राजक्तानं देवीकडे कोणती मागणी केली होती आणि १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प कशासाठी, याचा संपूर्ण अंदाज बांधता येतो.

प्राजक्ता माळी म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील (Maharastrachi Hasyajatra) प्राजक्ताचं सदाबहार फूल आहे. प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल कॉमेडी शोचं तेवढ्याच ताकदीने सूत्रसंचलन करते आणि कधी कधी स्कीटमध्ये भागदेखील घेते. स्टेजवरील कॉमेडीला प्राजक्ता कशी प्रतिसाद देते, हे पाहणंही आनंददायी असतं. त्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्राजक्ताचा वावर प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना प्रसन्न करणारा असतो. त्यामुळे प्राजक्ताचं प्रत्येक ट्वीट, इन्स्टावरील व्हिडीओची तिचे वाट पाहत असतात आणि आपापल्यापरिनं त्याचा अर्थ काढत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

म्हणूनच प्राजक्ता माळीचा नवा व्हिडीओ पाहून तिचे चाहते काही काही क्षण अवाक् झाले. प्राजक्ता माळी चक्क नवरी (Bridal look) बनली आहे. त्यामुळे लवकरच शुभमंगल सावधान होणार, याचा आनंद आणि काहीसी चुटपूटही चाहत्यांना लागून राहिली आहे. गेल्या काही वर्षांत प्राजक्ता माळी अभिनयासोबत (Actress Pajakta Mali)  व्यवसायातही पाय रोवून उभी राहिली आहे. शिवाय तिने घेतलेल्या फार्महाऊसचीही चर्चा आहेच. या सर्व पार्श्वभूमीवर प्राजक्ताचं शुभमंगल डेस्टिनेशन फार्महाऊसवर होणार, अशीही चर्चा आहे.

हे ही पाहा

राज ठाकरेंवरील तडीपारीचा गुन्हा रद्द

जावेद अख्तर यांनी मनसे दीपोत्सव कार्यक्रमात दिल्या ‘जय सिया राम’ च्या घोषणा

मराठ्यांचे वाटोळे करणारे ‘ते’ कोण? २४ डिसेंबरला जरांगे-पाटील नावे जाहीर करणार

पण जरा थांबा! थेट सुतावरून स्वर्ग गाठू नका! प्राजक्ता नवरीसारखी नटली आहे हे खरं असलं तरी ती जाहिरातीसाठी नटली आहे. ही जाहिरात ज्वेलर्सची आहे. यात नववधूच्या पेहरावात आणि सोन्याच्या वैविध्यपूर्ण दागिन्यांत मढलेली प्राजक्ता  माळीला पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल, की आता तिचं ठरलं. तर अफवांनी इथंच पूर्णविराम देऊया आणि लवकरच प्राजक्ताचं ठरलं, अशी खरी बातमी येऊ द्या, अशी प्रार्थना तिचे हितचिंतक चाहते करत असल्याची माहिती ‘लय भारी’ला मिळाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी