30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रजाणून घ्या नरक चतुर्दशीचे महत्व...

जाणून घ्या नरक चतुर्दशीचे महत्व…

भारतातील सर्वात मोठा उत्सव समजला जाणाऱ्या दीपावली सणाला (Diwali 2023) आता सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगभर उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचे महत्व हिंदू संस्कृतीत अधिक आहे. वासुबारस पासून सुरू होणारा दीपावली उत्सव भाऊबीजपर्यंत मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात येतो. दीपावलीच्या पहिल्या दिवशी वासुबरस, दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी, तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi), चौथ्या दिवशी दिवाळी पाडवा तर पाचव्या दिवशी भाऊबीज साजरा करण्यात येतो. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या सणात नरक चतुर्दशीला फार महत्व असून दीपावलीची खरी सुरुवात नरक चतुर्दशी पासूनच होते, असा समज आहे. दिवाळीमध्ये नरक चतुर्दशीला एवढे महत्व का आहे? हे आपण समजून घेणार आहोत…

आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवसाला अभ्यंगस्नानाचे महत्त्व असून सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाने मालीश करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. हा सण दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्या दिवसापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. हा एक हिंदूंचा पवित्र सण असून भगवान श्रीकृष्णांनी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षांमधील चतुर्दशीला नरकासुराला मारून 16 सहस्त्र मुलींची सुटका केली होती. म्हणुन अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षांमधील चतुर्दशीला ‘नरक चतुर्दशी’ म्हंटले जाते.

हे ही वाचा

धनत्रयोदशीला सोने का विकत घेतात? वाचा सविस्तर

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस

प्रदूषणमुक्त वातावरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या मौलिक सूचना, काय म्हणाले मुख्यमंत्री

या दिवशी भारतातील सगळे लोक सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून सुवासिक उटणे तसेच तेल लावून गरम पाण्याने अंघोळ करतात. म्हणजेच शरीरातील नरकासुररुपी वाईट विचारांचा नाश व्हावा यासाठी प्रार्थना केली जाते. अभंग स्नान झाल्यानंतर यमासाठी दीपदान केले जाते. पायाखाली करटुले नावाचे कडू फळ चिरडण्याची पद्धत आहे. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून ही प्रथा पार पाडली जाते. नवीन कपडे, दागिने परिधान करून देवदर्शन केले जाते. त्यानंतर फराळाचे पदार्थ घरातील सर्व सदस्य मिळून खातात. संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या, आकाश कंदील लावून जागोजागी रोषणाई करण्यात येते.

या सणाला नरक चतुर्दशी, नरक पूजा किंवा रूप चतुर्दशी सारख्या इतर नावांनी देखील ओळखले जाते. यासोबतच या दिवशी संध्याकाळी दिवा दान करण्याची प्रथा आहे, हा दिवा यमराजासाठी केला जातो, पौराणिक कथांनुसार या दिवशी यमदेवाची पूजा केली जाते. आश्विन महिन्यातील कृष्ण तिथीच्या दिवशी पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास जन्मभर केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, तसेच नरक आणि अकाली मृत्यूचे भय राहत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी