28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरराजकीय'आत्महत्या करू नका', मराठा आंदोलकाच्या आत्महत्येवर नाना पटोलेंचे आवाहन

‘आत्महत्या करू नका’, मराठा आंदोलकाच्या आत्महत्येवर नाना पटोलेंचे आवाहन

राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून सभा घेतल्या जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे देखील आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात काही दिवसांपूर्वी जरांगेंनी मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र मिळावे, यासाठी उपोषण करून सरकारकडे मागणी केली. यावेळी जरांगे-पाटील यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तर इतरही काही नेते गेले होते. सरकारने आरक्षणासाठी थोडा वेळ द्या असे सांगितले होते. मात्र अजूनही सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. यामुळे आता जरांगे-पाटलांनी सभा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. यावर कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘आत्महत्या करू नका’ असे मराठा समाजाला आवाहन केले आहे.

आज (18 ऑक्टोबर) या दिवशी जालना जिल्ह्यातील सुनील बाबुराव कावळे या मराठा आंदोलकाने मुंबईत आत्महत्या केली आहे. मराठा मोर्च्याचे आंदोलक विनोद पाटील यांनी ट्वीटर x या अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मराठा बांधवांनो आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. अर्ध्यावर लढाई सोडून जाऊ नका, खचून जाऊ नका. मराठा आरक्षण हा मुद्दा आमच्या जगण्याशी संबंधीत आहेत. सरकार आता तरी जागे व्हा. मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी सरकारने लवकरात लवकर पाऊले उचलावीत. नाहीतर उद्रेक अटळ आहे. सुनील बाबुराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट विनोद पाटील यांनी लिहली आहे.

हेही वाचा 

मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुल कोसळण्यावरून मनसे आक्रमक

‘आम्हाला संपवुन टाकाल का?’ फडणविसांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचा सवाल

राहुल गांधीच भावी पंतप्रधान, बावनकुळेंसमोर तरूणाने दिले उत्तर

चार चार मुख्यमंत्री आले तरी आरक्षण मिळाले नाही 

आतापर्यंत चार चार मुख्यमंत्री आले तरीही आरक्षण मिळले नाही. पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हा कोर्टात टिकले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. उद्धव ठाकरे आले तेव्हा त्यांच्या कार्यकाळात आरक्षण रद्द झाले. तर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन दीड वर्षे झाले तरीही आरक्षण मिळाले नाही. यावर आता कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी याबाबत ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे.

काय म्हणाले पटोले?

यावर आता कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी याबात ट्वीट करत कोणीही आत्महत्येचे पाऊल उचलू नका. देवेंद्र फडणवीस यांची कुणबी आणि मराठा यांच्याबाबत वेगळी विधाने आहेत. आरक्षण संपुष्टात आणणार भाजप कोणालाही आरक्षण देणार नाहीत. असे ट्वीट करत पटोले यांनी भाजपवर टिकस्त्र केले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी