31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeराजकीयनवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना धमक्यांसहित फुकट सल्ले

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना धमक्यांसहित फुकट सल्ले

टीम लय भारी

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून निसर्गनिर्मित वादळे महाराष्ट्राला सतत तडाखे देत आहेत. त्यांचाच बाऊ करून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना तडाखे दिले आहेत. (navneet rana raised a question wether Maharashtra has a Chief Minister or not)

महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत की नाहीत, असा प्रश्न मला पडतो आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांची हेटाळणी केली आहे.

आदित्य ठाकरेंचे कार्बन संतुलित शहरांसाठी प्रयत्न

कायद्याचा चतुराईने फायदा घेत सत्ताधारी शिवसेनेने ५ हजार ७२४ कोटींचा भ्रष्टाचार

महाराष्ट्रात उद्भवलेल्या परिस्थितीला पाहून नवनीत राणा यांनी देशाचे कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी त्यावर कसा तोडगा काढता येईल तसेच शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याविषयी तोमर यांच्याशी चर्चा केली.

जास्त पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. या आपत्तीला मुख्यमंत्री सर्वस्वी जबाबदार असल्याचे नवनीत राणा यांनी ट्विटर वरून शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

या पुरात ४५० हुन अधिक लोक पाण्यात वाहून गेला असल्याने मुख्यमंत्र्यांनी एसी भवनांतून आढावा बैठका घेणे थांबवावे असे त्यांचे म्हणणे आहे. खासदासर नवनीत राणा कृषी मंत्र्यांच्या भेटी घेत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र गावोगाव फिरून नुकसानीची पाहणी करावी असे त्यांना वाटते.

मुंबई महापालिकेचं डिपॉझिट तोडून शेतकऱ्यांना मदत द्या : नितेश राणे

Navneet Ranaसांसद नवनीत व रवि राणा को जमानत, सैकड़ों कार्यकर .. 

प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर ३० हजारांची मदत करावी तसेच ज्या लोकांचा पुरामुळे वाहून मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी करायला हवी असेही त्या पुढे म्हणाल्या.

आणि असे न केल्यास महाराष्ट्रातील सर्व शेतकरी दिवाळीत मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर, मातोश्रीसमोर जाऊन आंदोलने करतील अशी धमकी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांची दिवाळीही साजरी होऊ देणार नाही नसे त्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी