29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeराजकीयशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटी संदर्भात नवाब मलिकांनी केला खुलासा

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटी संदर्भात नवाब मलिकांनी केला खुलासा

टीम लय भारी

मुंबई :-  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलेले आले आहे. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी खुलासा केला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्याकडे देण्यात आलेली नाही.” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे.

मुंबई व उपनगरात पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता!

मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो; छगन भुजबळांचा भाजपला इशारा

तसेच, “प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे? याची माहिती प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) दिली.” असे ही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले आहे.

सशक्त आघाडी निर्माण करणार

“देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवारांची (Sharad Pawar) इच्छा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) बंगालमध्ये जाणार होते, पण तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपाच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल.”, अशी भूमिका नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मांडली आहे.

मलिक यांच्या खुलाश्याचा अर्थ काय?

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधी आघाडी तयार करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीत याच मुद्दयावर चर्चा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही आघाडी कशी निर्माण करता येईल. त्यात कोणते पक्ष येऊ शकतात, भाजपविरोधी भूमिका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या इतर पक्षाच्या नेत्यांना कसे जवळ आणता येईल, यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच बसपा नेत्या मायावती, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅनली आणि सपा नेते अखिलेश यादव हे या आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे त्यांना कोणत्या मुद्द्यावर आघाडीत आणता येईल, याचीही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Prashant Kishor calls on NCP chief Sharad Pawar, sets off speculation

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही प्रशांत किशोर (Prashant Kishor) शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विरोधकांकडून २०२४ मध्ये भाजपाला तगडे आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी तर तमिळनाडूतील द्रमुकच्या विजयात प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. २०१४ मधील मोदी यांचा विजय किंवा विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे आडाखे आणि नियोजन उपयोगी पडले होते. राज्य विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शिवसेनेला सल्ला दिला होता आणि आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी