26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeराजकीयभीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे - फडणवीस सरकारची नवी...

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे – फडणवीस सरकारची नवी खेळी

टीम लय भारी

मुंबई : औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराच्या निर्णयाला सत्ता बडखास्त करण्याआधी महाविकास आघाडीने मंजूरी दिली होती; परंतु शिंदे – फडणवीस सरकारकडून आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे नव्या सरकारच्या या निर्णयावर पुन्हा राजकीय संघर्षाची ठिणगी पडणार आहे.

शिवसेना आमदार एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारले त्यामुळे महाविकास सरकार दाणकन आपटले. बंडामुळे संख्याबळ कमी झाले असले तरीही सरकार बरखास्त करण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या  नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राज्यात आता शिंदे – फडणवीस यांचे नवे सरकार आले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांना खोडून आपलाच घोडा दामटण्याची खेळी या सरकारकडून खेळण्यात येत आहे. आरेच्या मुद्यानंतर नवं सरकार आता नामांतरांच्या निर्णयावर आपली भूमिका मांडू लागले आहे.

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे - फडणवीस सरकारची नवी खेळी

दरम्यान औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा पाटील असे नामांतरच्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्धीचे पत्र दिल्यानंतर मंत्रिमंडळात अशा प्रकारचे लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेता येत नाहीत असे म्हणून महाविकास सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्षेप घेत स्थगिती देण्यात आली आहे.

याआधी नामांतराच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. आता नव्या सरकारकडूनच याबाबत पाऊल उचलण्यात आले असून शिंदे सरकार तिन्ही नामांतरांच्यां मुद्यावर नव्याने निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

आजपासून पुढील 75 दिवस ‘कोविड बुस्टर’ डोस मिळणार मोफत

राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

पन्हाळगडाच्या पडझडीला केंद्र सरकार जबाबदार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी