27 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरराजकीय'ये पब्लिक है ये सब जानती है', जितेंद्र आव्हाड इंधन दराच्या निर्णयावर...

‘ये पब्लिक है ये सब जानती है’, जितेंद्र आव्हाड इंधन दराच्या निर्णयावर गरजले

टीम लय भारी

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने काल इंधन दराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. यामध्ये राज्यात पेट्रोल 5 रुपये प्रतीलिटर आणि डिझेल 3 रुपये प्रति लीटर करण्यात आला असून सामान्य जनतेला यातून दिलासा देण्यात आला आहे. या निर्णयाचे भाजप पक्षाकडून जोरदार स्वागत झाले परंतु विरोधी पक्षाकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सोशल मिडीयावर याबाबत पोस्ट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दर कमी झाल्याच्या निर्णयानंतर सोशल मिडीयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, सोबतच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा याबाबतचा एक जुना व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

डाॅ. आव्हाड ट्विटमध्ये लिहितात, “मवीआ सरकारने,पेट्रोल डिझेलवरील करामध्ये 50% कपात करावी अशी मागणी भाजपने केली होती.विरोधात असतांना एक बोलायचे आणि सत्तेत आल्यावर करायचे दुसरे”, असे म्हणून त्यांनी भाजपच्या या दुहेरी वागण्यावर टीका केली आहे.

'ये पब्लिक है ये सब जानती है', जितेंद्र आव्हाड इंधन दराच्या निर्णयावर गरजले

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणतात, ” पब्लिक है ये सब जानती है !” असे म्हणून त्यांनी भाजपला मिश्किल टोला लगावत त्यांना भानावर आणले आहे.

मविआ सरकार असताना भाजपची एक भूमिका आणि सत्तेत आल्यावर दुसरी असे चित्र सध्या वारंवार पाहायला मिळत आहे, त्यामुळे नेमकी खरी भूमिका कोणती असा संभ्रम सध्या वाढताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा…

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे – फडणवीस सरकारची नवी खेळी

आजपासून पुढील 75 दिवस ‘कोविड बुस्टर’ डोस मिळणार मोफत

पश्चिम द्रुतगती महामार्ग गेला पाण्यात

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!