33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयपनवेल-उरणमध्ये शेकापचे जोरदार कमबॅक

पनवेल-उरणमध्ये शेकापचे जोरदार कमबॅक

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर राज्यात अनेक नेते मंडळी आपला पक्ष विजयी झाला असल्याचा दावा करत आहेत. प्रसारमाध्यमांद्वारेही भाजप विजयी झाला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावरून राज्यात नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. निवडणूक ग्रामपंचायत पातळीवर गावांपूर्तीच मर्यादित असते. मात्र याची चर्चा आता मुंबईतील मंत्री करत आहेत. कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी (Nana patole) नागपूरमधील निवडणुका या महाविकास आघाडीने जिंकल्याचे सांगितले आहे. भाजप खोटा दावा करत आहे असा आरोप केला आहे. याचमद्दयाला धरून आता पनवेल-उरण (Panvel-Uran) तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Local Body election) भाजप (BJP) पिछाडीवर पडले आहे. या दोन तालुक्यात शेकापची (Shetkari Kamgar paksh) मजबूत पकड होती. मात्र, २०१४ पासून या तालुक्यात भाजपने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. काही महिन्यांपासून शेकापने पुन्हा एकदा आगामी निवडणुकीचा अंदाज पाहता कमबॅक केले आहे.

अनेक वर्षांपासून पनवेल आणि उरणमध्ये भाजपचे पारडे जड झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र आगामी निवडणुकांचे वेध घेता पनवेलमध्येही सत्ता पालट होण्याच्या चर्चा सुरू आहेत. अनेक वर्षांपासून पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) यांचे वर्चस्व आहे. एकेकाळी शेकाप हा पनवेलचा बालेकिल्ला होता. मात्र २००९ पासून शेकाप पक्षाकडून बाळाराम पाटील यांनी दोनदा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याआधी उरण तालुक्याचे आमदार आणि शेकापचे नेते विवेक पाटील चर्चेत होते, मात्र विवेक पाटील घोटाळ्यात अडकल्याने पनवेल-उरण तालुक्यावर भाजपची पकड आणखी मजबूत झाली.

हे ही वाचा

मराठा आरक्षणासंदर्भात निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन

दोन्ही सभागृहात हॉटलाईन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक- निलम गोऱ्हे

सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला दम

मागे झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर प्रकाश टाकता भाजपचे पारडे जड असेल असा अंदाज लावला जात होता. पनवेल आणि उरण भागात महाविकास आघाडीच्या सरपंचपदी अधिक जागा निवडूण आल्या आहेत. या दोन्ही तालुक्यात आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचार केला मात्र त्याच गावात शेकापच्या सरपंचाने भाजपच्या सरपंचांवर विजय मिळवला. दरम्यान, या दोन्ही तालुक्यांचा वेगाने विकास होऊ लागला आहे. यामुळे पनवेल आणि उरणमध्ये शहरीकरण आणि निमशहरीकरण असे दोन भाग पडले आहेत. निमशहरीकरणात गावांचा समावेश होतो. तर शहरीभागात कॉलन्यांचा समावेश होतो. आता या पाठोपाठ उरणचाही विकास होऊ लागला आहे. यामुळे यांचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो.

शेकापचे कमबॅक

दरम्यान, उरण आणि पनवेल तालुक्याच्या ग्रामपंचायती निवडणुकांचा विचार केल्यास पनवेलमध्ये एकूण १७ गावांमधून ११ गावांमध्ये शेकाप आणि महाविकास आघाडीचे सरपंच विजयी झाले आहेत. तर खालापूर येथील ५ पैकी ५ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. पनवेल शहराला पुणे-रायगड भागात मावळमतदारसंघ अगदी जवळ असल्याने आगामी निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात चूरस रंगणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी