29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयपंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार आणि शरद पवार येणार एकाच स्टेजवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार आणि शरद पवार येणार एकाच स्टेजवर

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार गट आणि भाजपमध्ये आता मोठे वितुष्ठ निर्मान झाले आहे. अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारसोबत हातमिळवणी केल्यानंतर पवारांनी येवल्याच्या सभेतून राष्ट्रवादीतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आव्हान दिले होते. या सर्व राजकीय राड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच पुण्यात एका स्टेजवर येणार आहेत.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान् टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केला आहे. या ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा आज (दि.१०) रोजी पुण्यात केली. हा पुरस्कार लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून शरद पवार यांना या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे.

राष्ट्रवादीत मोठी फुट पडल्यानंतर आता प्रथमच पवार आणि मोदी एका स्टेजवर येणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ट्रस्टचे विश्वस्त आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे देखील उपस्थित असतील. त्यामुळे या कार्यक्रमाला आता राजकीय महत्त्व देखील प्राप्त झाले आहे.

हे सुद्धा वाचा 

मुंडे कुटुंब कोणी फोडले याचे उत्तर अजित पवार यांनी सात वर्षापूर्वीच दिले होते; खरे कोण भुजबळ की पवार

रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा आणि तो भरतशेठच; आमदार भरत गोगावले यांचा अदिती तटकरेंना विरोध

शिवसेनेत असताना पावसात बैठका घ्यायचो; भुजबळ यांचा पवारांना खिजवण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीत फुट पडण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत राष्ट्रवादीत बंडाळी झाली आणि अजित पवार यांच्यासह एक मोठा गट शिंदे-फड़णवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर या बंडाळीचे श्रेय कोणाला द्याल असा प्रश्न जेव्हा माध्यमांनी पवारांना विचारला तेव्हा याचे श्रेय मी पंतप्रधानांना देतो असा उपरोधिक टोला लगावला होता. नुकतीच पवार यांची येवल्यात मोठी सभा झाली या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधानांनी ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यावर कारवाई करावी असे आव्हान देखील दिले होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी