30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईमी कधीच कोणत्याही मंत्र्यांकडे पैशाची कामे घेऊन गेलो नाही : राज ठाकरेंनी...

मी कधीच कोणत्याही मंत्र्यांकडे पैशाची कामे घेऊन गेलो नाही : राज ठाकरेंनी ठणकावले

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : काँग्रेस – राष्ट्रवादीमधील सगळे भ्रष्टाचारी आता भाजप – शिवसेनेमध्ये गोळा झाले आहेत. अन् हे भाजपवाले मला ईडीची भीती दाखवतात. मला काही फरक पडत नाही. मी घाबरत नाही. मी कधी असले धंदे केले नाहीत. काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार असेल, किंवा आताचे भाजप – शिवसेनेचे सरकार असेल, मी कधीच कुठल्या मंत्र्यांकडे पैशाची कामे घेऊन गेलो नाही. एका तरी मंत्र्यांने सांगून दाखवावे मी तुमच्याकडे असली कामे घेऊन आलो आहे का ? असा घणाघाती सवाल राज ठाकरे यांनी केला. ते घाटकोपरमधील प्रचारसभेत बोलत होते.

राज पुढे म्हणाले की, सगळे भ्रष्टाचारी भाजप व शिवसेनेमध्ये जमा झाले आहेत. थोडी भीती दाखविली की, काँग्रेस – राष्ट्रवादीमधील हे भ्रष्टाचारी नेते लगेच भाजपमध्ये दाखल होतात. सत्तेमधील नेत्यांवर विरोधी पक्षाचा दबाव राहिलेला नाही. त्यामुळे समस्या सुटत नाहीत. रस्त्यांवरील खड्डे का दिसतात. कारण रस्ते बनविण्यासाठी कंत्राट दिले जाते. त्याच रस्त्यात खड्डे पडले म्हणून पुन्हा नवीन कंत्राट दिले जाते. 200 कोटींचे एकेक कंत्राट असते. या कंत्राटातून सरकारमधल्या मंडळींना टक्केवारी मिळत असते. सामान्य जनता ट्विटवर, वॉटस्अपवरून रस्त्यातील खड्ड्यांचे फोटो पाठवत राग व्यक्त करीत असते. हे मात्र टक्केवारी ओरपतात, असाही आरोप राज यांनी केला.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंचा शिवसेनेला इशारा : चौथी भाषा मुंबईत आणली तर बांबू…

राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण : भाजप – शिवसेनेच्या वचनाम्याची केली चिरफाड, शाह – मोदींवरही टिकास्त्र

राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण : भाजप – शिवसेनेच्या वचनाम्याची केली चिरफाड, शाह – मोदींवरही टिकास्त्र

राज ठाकरेंची अजब मागणी, विरोधी पक्षात राहण्यासाठी मतं द्या

नरेंद्र मोदी यांच्या दोन निर्णयामुळे देशाची पुरती वाट लागली. नोटबंदी व जीएसटी हे दोन्ही निर्णय चुकले. रिझर्व्ह बँकेत ठेवलेली पावणे दोन लाखांची सुरक्षित रक्कम सरकारने काढून घेतली. मग सरकारचे पैसे गेले कुठे ?. महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्याचा प्रचार अमित शाह करतात. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलत नाहीत. गेल्या पाच वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर अमित शाह काहीच बोलत नाहीत, याकडेही राज यांनी लक्ष वेधले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी