29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईराज ठाकरेंचा शिवसेनेला इशारा : चौथी भाषा मुंबईत आणली तर बांबू...

राज ठाकरेंचा शिवसेनेला इशारा : चौथी भाषा मुंबईत आणली तर बांबू…

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  मोबाईल फोनवर हिंदी आणि इंग्रजी भाषा होती. मनसेच्या दणक्याने मराठी भाषा सुरू झाली. पहिली भाषा मराठी आली पाहिजे अशी आम्ही काही वर्षांपूर्वी मागणी केली. देशात त्रिसूत्री धोरण आहे. त्यामुळे तीन भाषा ठीक आहेत. पण मुंबईत परत चौथी भाषा आणायचा प्रयत्न केला तर बांबू बसेल, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला इशारा दिला. ते भांडूप येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ वरळीमध्ये गुजराती, ऊर्दू, तेलगू अशा विविध भाषांमधील फलक लावण्यात आले आहेत. या विविध भाषांतील फलकांवरून उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. त्यात आता राज ठाकरे यांनीही चाबूक ओढला आहे. शिवसेनेचे नाव न घेता ते म्हणाले की, मुंबईत चौथी भाषा आणली तर बांबू बसेल.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण : भाजप – शिवसेनेच्या वचननाम्याची केली चिरफाड, मोदी – शाहंवरही टिकास्त्र

राज ठाकरेंची मागणी, विरोधी पक्षात राहण्यासाठी मतं द्या

मनसे – भाजप एकत्र, पण एकाच मतदारसंघापुरते

मनसे उमेदवाराची शिवसैनिकांना साद, कै. आनंद दिघेंच्या कर्तृत्वाची जागी केली आठवण

मी कधीच कोणत्याही मंत्र्यांकडे पैशाची कामे घेऊन गेलो नाही : राज ठाकरेंनी ठणकावले

राज यांनी पुढे पुढे बोलताना सांगितले की, मनसेने अनेक आंदोलने केली. त्याचे रिझल्ट दिले. तरी मला पत्रकार विचारतात, राज ठाकरे आंदोलने अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. मनसेने ज्या ज्या वेळी आंदोलनं केली, ती सगळी आंदोलनं तडीस नेली. त्यावेळी बाकीचे राजकीय पक्ष कुठं शेपट्या घालून बसले होते.

आजची निवडणूक त्यासाठीच आहे. तुमच्या मनातील राग कुणी व्यक्त करायचा. म्हणूनच, मला विरोधी पक्षासाठी मतदान करा. मला सरकारवर अंकुश ठेवायचा आहे. या देशातील उद्योगधंदे बंद होत जाणार. भारत पेट्रोलियम नफ्यामधील प्रकल्प आज रिलायन्सला देवून टाकताहेत. उद्या तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार. मुंबईतील डायमंडचा व्यवसाय गेला. इतर सगळे व्यवसाय रसातळाला जात आहेत. हे असले सरकार असेल तर तिथे प्रबळ विरोधी असायला हवा. म्हणून माझ्या शिलेदारांना मतदान करा. सरकारला कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करावा लागेल, असे आश्वासनही राज यांनी यावेळी मतदारांना दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी