27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयराज ठाकरे यांचे भाकित खरे ठरतेय...

राज ठाकरे यांचे भाकित खरे ठरतेय…

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘एकदा मतदान झालं, की तुम्ही जगलात काय आणि मेलात काय, यांना (भाजप व शिवसेना) काय फरक पडणार नाही’ हे जाहीर विधान आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज यांनी भाजप व शिवसेनेच्या थापेबाजीवर जोरदार टिकास्त्र सोडले होते. राज यांनी व्यक्त केलेले भाकित सध्याच्या सत्ता संघर्षातून सत्यात येताना दिसत आहे.

‘लय भारी’ बातम्या वॉटस् अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

विधानसभा निवडणुकीत राज यांनी भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, गोरेगाव, विलेपार्ले इत्यादी ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. या प्रचारामध्ये त्यांनी बरोजगारी, शेती, शहरांचे बकालीकरण या प्रश्नांवर जोरदार फटकेबाजी केली होती. सन 2014 व सन 2019 मधील भाजप व शिवसेनेच्या जाहिरनाम्यांचीही त्यांनी चिरफाड केली होती. जाहिरनाम्यांमध्ये भाजप व शिवसेना अनेक आश्वासने देतात. पण या आश्वासनांचे ते पालन करीत नाहीत. जनताही त्यांना विचारत नाही. निवडणुका होईपर्यंत हे स्वप्ने दाखवतात. निवडणुका झाल्यानंतर जनता जगतेय की मरतेय याची भाजप व शिवसेना चिंता करणार नाही, असे भाकीत राज यांनी वर्तविले होते.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण : भाजप – शिवसेनेच्या वचनाम्याची केली चिरफाड, शाह – मोदींवरही टिकास्त्र

राज ठाकरेंचा शिवसेनेला इशारा : चौथी भाषा मुंबईत आणली तर बांबू…

मी कधीच कोणत्याही मंत्र्यांकडे पैशाची कामे घेऊन गेलो नाही : राज ठाकरेंनी ठणकावले

सध्या राज्यात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा सत्यानाश झाला आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ मदत पोचविणे आवश्यक आहे. परंतु भाजप व शिवसेनेतील सत्ता संघर्षामुळे शेतकऱ्यांची कोणीच चिंता करीत नाही, असे चित्र दिसत आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी राज ठाकरे यांनी वर्तविलेले भाकीत निवडणुकीनंतर लगेचच खरे ठरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी