28 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीस, रोहित पवार एकाच तालुक्याच्या दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस, रोहित पवार एकाच तालुक्याच्या दौऱ्यावर

टीम लय भारी

सातारा:- कऱ्हाड-पाटण तालुक्यात महापूर आणि भूस्खलन परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकाच तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते दौऱ्यावर करणार आहेत. कऱ्हाड-पाटण तालुक्यातील परिस्थितीचा आढावा व जनतेचे सांत्वन करण्यासाठी बुधवार (ता.28) आमदार रोहित पवार दौऱ्यावर येत असून, याच दौऱ्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत (Rohit Pawar and Devendra Fadnavis will be touring in the same taluka).

कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती व भूस्खलन भागाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज दौऱ्यावर येत आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत करण्यासह त्यांचे दुःख हलकं करण्यासाठी रोहित पवार दौऱ्यावर येणार आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार रोहित पवार

पूरग्रस्त भागात राजकीय दौरे नको; शरद पवार

आज सकाळी ते कऱ्हाड पाटणसहित चिपळूणला भेट देणार आहेत. रोहित पवार गुरूवारी कोल्हापूर व सांगलीचा दौरा करणार असून गुरूवारी सायंकाळी ते वाई येथे भेट देवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत (Rohit Pawar will inspect the damaged area and interact with the citizens.)

Rohit Pawar and Devendra Fadnavis tour same taluka
रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस हे कोयनानगर येथील स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन करणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी एक वाजता मोटारीने कृष्णा अभिमत विद्यापीठ कऱ्हाड येथे आगमन होणार आहे. तेथून मोटारीने ते दुपारी पावणेतीन वाजता आंबेघर- मोरगिरी येथे जाऊन तेथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तेथून दुपारी सव्वातीन वाजता ते कोयनानगरकडे जातील.

चिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Maharashtra: Devendra Fadnavis, Pravin Darekar leave for 3-day tour to flood affected areas in Western Maharashtra

कोयनानगर येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ते पाटण तालुक्यातील हुंबरळी येथे जाऊन अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. तेथून ते पुन्हा कऱ्हाडला येऊन कृष्णा अभिमत विद्यापीठ येथे मुक्कामी थांबणार आहेत (Devendra Fadnavis will comfort the displaced families in Koynanagar by discussing with them).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी