31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय'देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा'

‘देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा’

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर (५ डिसेंबर) ईडीने छापे मारले आहेत. मुंबईतील ६ कार्यालयावर हे छापे मारले असून बारामती तालुक्यातील पिंपळी येथे ही कंपनी आहे. दिवसभर ईडीने (ED) कंपनीमध्ये छापेमारी केली. काही आवश्यक कागदपत्रांची ईडीने मागणी केली. यावर रोहित पवार यांनी कागदपत्रे दिली आहेत. यावर शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक पोस्ट शेअर केली होती. अशातच आता ईडीच्या चौकशीवर रोहित पवार (Rohit pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) आणि भाजपला खडे बोल सुनावलं आहे. तर अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांना देखील रोहित पवार यांनी गप्प का? असा सवाल केला आहे.

ईडीच्या चौकशीनंतर आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीने टाकलेल्या कंपनांच्या छाप्याबाबत रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘ईडी, सीबीआयला आम्ही सहकार्य केलं आहे. पण काहीजण सुडाचं राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. यानंतर त्यांनी फडणवीस ज्या शहरात जातात त्या ठिकाणी खून होतात. संपूर्ण देशामध्ये सर्वात वाईट स्थिती ही महाराष्ट्राची आहे. एकतर गृहमंत्री पद ठेवा नाहीतर उपमुख्यमंत्री पद ठेवा. एका तरी पदाला न्याय द्यावा. नाहीतर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकावा’, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा

२२ जानेवारीला आयोध्या नाहीतर काळाराम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे घेणार दर्शन

‘मी फक्त ढकललं मारलं नाही’

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी सुरू

‘राजकारणात येऊन मोठे झाले त्याचं काय’?

‘ईडीच्या अधिकाऱ्यावर आमचा आक्षेप नाही. त्यांना हवी असलेली मदत आम्ही केली. सर्व कागदपत्रं आम्ही दिले आहेत. तुमच्याकडे येण्यापूर्वी ज्यांच्यावर आरोप होते त्यांचं काय? मी राजकारणात येण्याआधी व्यवसायिक होतो. पण जे राजकारणात येऊन मोठे व्यवसायिक झाले आहेत त्याचं काय? लोकांना दिसत आहे’, अस म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.

‘अजित दादा गप्प का’?

सुनील कांबळे हे एका कार्यक्रमासाठी पुण्यात असताना त्यांनी एका पोलिस कर्मचारी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्याला मारल्यावरून रोहित पवार यांनी अजित पवार यांचे कान टोचले आहेत. ‘भाजपची सत्ता आल्यापासून चार-पाच पोलिसांना मारण्यात आलं आहे. सुनील कांबळे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली. अजितददा व्यासपीठावर उपस्थित होते. मग यावेळी अजित दाद गप्प का’? असा सवाल आता रोहित पवार यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी