31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय'मी फक्त ढकललं मारलं नाही'

‘मी फक्त ढकललं मारलं नाही’

राजकीय क्षेत्रामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. ससून रूग्णालयामध्ये आज पुण्यात राडा झाला आहे. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी आज घृणास्पद कृत्य केलं असल्याचं विरोधी पक्षाकडून दावा केला जात आहे. व्हिडीओ पाहिल्यावर कळतं की सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या कानशीलात लगाल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल (Sunil kamble Viral video) होत आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघायची चिन्हे आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. सुनील कंबळे यांनी मारलं असूनही ते आपली चूक मान्य करत नाहीत. (sunil kamble slapped)

‘मी मारलं नाही’

व्हिडीओ पाहिल्यास सुनील कांबळे यांनी मारलेलं चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही मी मारलं नसल्याचं सुनील कांबळे म्हणाले आहेत. ‘मी का मारू? मी ओळखतच नाही त्या व्यक्तीला. मी सकाळी नाश्ता केला नव्हता. तसाच निघून आलो. त्यामुळे गोळ्या खायच्या राहून गेल्या. त्यामुळे नंतर काय झालं हे मला कळालंच नाही’, असं सुनील कांबळे म्हणाले आहेत.


हे ही वाचा

कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यात मुळशी पॅटर्न

६.५ कोटी रूपयांचं खानपानाचं बिल, सरकार कोणावर किती खर्च करतं?

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी सुरू

‘मी स्टेजवरून उतरत असताना दुसरा व्यक्ती मध्ये आला. मी फक्त त्याला तिथून बाजूला ढकलून लगेच निघून गेलो. वाद करायचा असता तर तिथंच थांबलो असतो. मी बाजूला झालो’ असं सुनील कांबळे म्हणाले आहेत. व्हिडीओमध्ये कानशीलात मारल्याप्रमाणे दिसत असल्यासारखं वाटत असल्याने त्यांना विचारले असता, तुम्ही नीट पाहा मी काही पाहिलेलं नाही’, असं म्हणत सुनील कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘रूपाली चाकणकरांसोबत होतो’

मी रूपाली चाकणकरांसोबत होतो. त्यावेळी त्या म्हणाल्या ‘अरे आमदारांना जावू द्या.’ जिथे ते पोलिस होते त्यांनी मला बाजूला नेलं. पुढे काय झालं मला माहित नाही, मी कार्यक्रमातून निघून गेलो. नाव पत्रिकेमध्ये नसल्याने नाराज होतो मात्र मारहान केली नाही’, असं सुनील कांबळे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी