30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयरोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी सुरू

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी सुरू

सत्ताधारी पक्ष विरोधकांवर ईडीची चौकशी करत आहेत. काहीजन तर ईडीला घाबरून आपला स्वत:चा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊन युती करत आहेत. काही महिन्यांपूर्वी रोहित पवार यांचे काका म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आमदारांवर ईडीची चौकशी केली याप्रकरणी आता अजित पवार आणि इतर नेत्यांनी भाजपसोबत युती केली असल्याची चर्चा आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील शरद पवार गटाला सोडलं. तर दुसरीकडे भाजपशी युती केल्याने ईडीने भुजबळ यांची ईडीची याचिका मागे घेतली. अशातच आता याउलट रोहित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असल्याने त्यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर ईडीने धाड टाकली आहे.

मुंबईतील ५-६ कार्यालयावर ईडीने धाड टाकली असून चौकशी सुरू आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी येथे असलेल्या बारामती अॅग्रो कंपनीवर सकाळी ८ ते ८.३० दरम्यान ईडीने कंपनीवर धाड टाकली आहे. यावेळी कंपनीमध्ये इतर कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे. मागील वर्षी रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली होती. यामुळे यावर्षी त्यांच्या कंपनीवर ईडीने चौकशी करायला सुरूवात केली आहे. सध्या अशा परिस्थितीमध्ये रोहित पवार यांनी अन्यायाविरोधात ही लढाई आपण लढण्याबाबत महाराष्ट्रातील पुरोगामी नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीविरोधात ‘मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल’, अशी पोस्ट लिहिली आहे.

हे ही वाचा

६.५ कोटी रूपयांचं खानपानाचं बिल, सरकार कोणावर किती खर्च करतं?

संकटांवर जिद्दीने मात करत सुप्रिया पाठारे यांनी चक्क दागिने विकून पुन्हा सुरु केले हॉटेल ‘महाराज’

‘राम सिया राम…’ गाण्यावर विराट कोहली भक्तीत तल्लीन, भाजपने व्हिडीओ शेअर करत उचलला फायदा

काय आहे ‘x’ ट्विटर पोस्ट?

‘हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा.ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल…’

मागील वर्षा बारामती अॅग्रो कंपनीबाबत रोहित पवारांना ईडीने समन्स बजावलं होतं. मात्र आज त्याची चौकशी सुरू आहे. मुंबईमध्ये देखील त्यांच्या कार्यालयावर धाड मारण्यात आली असून बारामती तालुक्यातील पिंपळी तालुक्यामध्ये बारामती अॅग्रो ही कंपनी रोहित पवार यांचीच आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी