31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्रिकेटडेव्हिड वॉर्नरचा कसोटी क्रिकेटला राम राम

डेव्हिड वॉर्नरचा कसोटी क्रिकेटला राम राम

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघामध्ये कसोटी सामन्याची चुसर बघायला मिळत होती. हे सामने ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आले होते. या कसोटी समान्यामध्ये कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली आहे. तिसरा सामना हा ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया संघातील डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) खूपच खास होता. कारण तिसऱ्या सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर कसोटीतून निवृत्त (David warner retired) होणार असल्याची घोषणा त्यानं काही दिवसांआधी केली होती. तिसरा सामना सिडनी येथे खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं (Australia) विजय मिळवला आहे. वॉर्नरने शेवटच्या सामन्यामध्ये ५७ धावा केल्या आहेत. ३-० ने कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रलियानं विजय मिळवला आहे. हा सामना डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा सामना होता त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

डेव्हिड वॉर्नर भावूक

वॉर्नरचा हा कोसोटीमधील शेवटचा सामना असल्याने तो खूपच भावूक झाला. १८ वर्षांची त्याची क्रिकेट कारकिर्द आहे, क्रिकेटसाठी तो आपला भाऊ स्टिव्ह आणि कुटुंबाचा नेहमी पाठिंबा असल्याचं सांगत होता. त्याची पत्नी कॅंडिसने देखील मोलाची साथ दिल्याचं तो म्हणाला आहे. यामुळे तो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होऊ शकला असल्याचं तो म्हणाला आहे.

हे ही वाचा

‘देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा’

२२ जानेवारीला आयोध्या नाहीतर काळाराम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे घेणार दर्शन

मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील करणार पाठपुरावा

‘मी मरेपर्यंत माझ्या कुटुंबावर प्रेम करेल’

डेव्हिड वॉर्नरचा भाऊ स्टिव्हला अनेकदा वाटायचे की डेव्हिडनं क्रिकेट खेळावं आणि तो क्रिकेटर झाला. ‘कुटुंबाची मोठी साथ असल्याने आज क्रिकेट क्षेत्रामध्ये आलो. तुम्हाला कुटुंबाची साथ असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही’, असं वॉर्नर म्हणाला आहे. ‘मी मरेपर्यंत माझ्या कुटुंबावर प्रेम करेल. सध्या मी आणखी काही बोलू शकत नाही, मी सध्या खूपच भावूक होत आहे’, वॉर्नर म्हणाला आहे.

वॉर्नरची कारकिर्द थोडक्यात

२०११ मध्ये वॉर्नरने कसोटी मध्ये पदार्पण केलं आहे. २००९ मध्ये वनडे आणि टी20 मध्ये पदार्पण केलं. डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यामध्ये ११२ कसोटी आणि १६१ वनडे सामने खेळले आहेत. कसोटा क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८ हजार ७८६ धावा आहेत. त्याने २६ शतके आणि ३७ अर्धशतकं झळकवली आहेत. वनडेमध्ये त्याने २२ शतकं आणि ३३ अर्धशतकं झळकावली आहेत. ६ हजार ९३२ धावा आहेत. त्याने ९९ टी20 सामने खेळले असून त्याच्या नावावर २ हजार ८९४ धावा आहेत.

निवृत्त होण्याआधी वनडे विश्वचषक आणि कसोटी सामना विजयी

वॉर्नर निवृत्त होण्याआधी वनडे विश्वचषकासाठी टीम इंडियाविरूद्ध त्याने चांगली कामगिरी केली. तसेच त्याने पाकिस्तान विरोधातही एकही सामना न हारता आपल्या बाजूने चांगली फलंदाजी केली आहे. हे त्याच्या यशाचं फळ त्याला अंतिम कसोटी मालिकेत आणि अंतिम वनडे वर्ल्डकपमध्ये मिळाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी