32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीय२२ जानेवारीला आयोध्या नाहीतर काळाराम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे घेणार दर्शन

२२ जानेवारीला आयोध्या नाहीतर काळाराम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे घेणार दर्शन

आयोध्या ही श्री रामाची जन्मभूमी असून या जन्मभूमीला २२ जानेवारी दिवशी देशभरातून असंख्य भक्त तसेच निमंत्रक राम लल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणेसाठी तसेच मंदिराच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाला काहीसे दिवस शिल्लक राहिले आहेत. राम मंदिराचा मुद्दा हा अनेक बाबींसाठी सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. एका मुस्लिम मुलीनं केलेली रामासाठी पायीवारी असो वा दक्षिण भारतातील एका तरूणाने प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तयार केलेल्या मूर्तीची निवड असो. दरम्यान राम मंदिराच्या मुद्द्यावरून असंख्य हिंदूंनी तसेच अनेक तरूणांनी आपले प्राण गमावले आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार असताना राम मंदिराचा मुद्दा मार्गी लावला. यामध्ये अनेकांना निमंत्रित करण्यात आलं तर अनेकांना अजूनही निमंत्रित करण्यात आलं नाही. यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोध्येला जाणार नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे.

सध्या देशामध्ये रामाच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आला आहे. यामुळे देशामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. यामुळे आता अनेकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. राम मंदिर या अध्यात्मिक मुद्द्याला राजकीय रंग प्राप्त होऊ नये असं अनेकांचं मत आहे. मात्र राजकीय रंग प्राप्त होत असल्याचा अनेक विरोधी नेत्यांचा दावा आहे. यामुळे आता काही नेते आयोध्येला जाणार नसल्याचं बोललं जात आहे. अशातच आता शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आयोध्येला जाणार नसल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. ‘आम्ही आयोध्या नाहीतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन २२ जानेवारी दिवशी दर्शन घेऊ’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा

मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील करणार पाठपुरावा

“‘ॲनिमल’सारखे सिनेमे यशस्वी होणे चिंताजनक” जावेद अख्तर यांचं मोठं विधान

मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील करणार पाठपुरावा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

निमंत्रण न आल्याने अनेक पक्षांमध्ये नाराजीचा सुरू उमटत आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी ‘२२ जानेवारी दिवशी आम्ही नाशकाच्या काळाराम मंदिरामध्ये जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरूजींनी संघर्ष केला होता. राम आमचा सुध्दा आहे’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारी नाशकाच्या काळाराम मंदिरामध्ये जाण्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

‘आम्ही केव्हाही आयोध्येला जाऊ’

‘आयोध्येतील राम मंदिराचा सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. त्याला कोणताही राजकीय रंग लागू नये. राम आमचाही आहे. आम्ही केव्हाही आयोध्येला जाऊ शकतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी