31 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeराजकीयवाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे (Shiv Sena leader Sanjay Raut has given a clear reply to Chandrakant Patil who asked him to befriend the tiger.)

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांना उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्याश आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये ही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत (Sanjay Raut) पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केले.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली; शिवसेनेचा केंद्राला टोला

मुसळधार पावसामुळे मालाडमधील इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू, 17 जण गंभीर

What local news reports tell us about Covid-19 mortality in rural areas of North and Central India

चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्या.

पंतप्रधानांनी राजकीय प्रचारच करु नये

नरेंद्र मोदी हे भाजपा आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झाले आहे ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच  आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असते. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असे ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

विधानसभेला 100 पार

एकमेकांचे लक्ष असते विधानसभेवर. आम्हांलाही वाटते की आमचा आकडा विधानसभेवर 100 पार जावा. त्यासाठी आतापासून प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तिन्ही पक्ष आपआपल्या पक्षासाठी काम करत आहेत. ते गरजेच आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

मालाड दुर्घटना दुर्दैवी  

मालाड इमारत दुर्घटना दुर्दैवी आहे. टीका करणाऱ्यांना करु द्या, स्वत: मुख्यमंत्री काल रस्त्यावर उतरले. सगळेच काल रस्त्यावर उतरले होते. टीका करणाऱ्यांना काय? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

“वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायाल आम्ही तयार आहेच”,  असे चंद्रकांत पाटील काल पुण्यात म्हणाले होते.

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असे सांगितले. त्यांचे म्हणणे फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आले असते. मोदींनी जर सांगितले, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते, असे चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी नमूद केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी