26 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023
घरराजकीयअल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश

राज्यात अल्पसंख्यांक समाजासाठी विविध प्रश्नाबाबत समस्या होत्या. त्यावर कुणीच लक्ष देत नव्हते. अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना प्रदेशात जाऊन शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी योजनेची आवश्यकता होती. मात्र हि योजना कित्येक वर्षांपासून मिळत नव्हती. तसेच त्यांच्या इतर अनेक प्रश्नांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात गेल्या आठवड्यात ता.२१ सप्टेंबर या दिवशी सभा घेतली. हि सभा बार्टी,सारथी,महाज्योती यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. याच योजना आता आझाद आर्थिक विकास मंडळालाही राबवता याव्या. याबाबत झालेल्या बैठकीत चर्चा घेण्यात आली होती. या बैठकीला अजित पवार यांच्यामुळे यश आले.

काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेऊन मुस्लीम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून याच पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. २१ सप्टेंबर याच दिवशी आढावा बैठक घेण्यात आली होती. या मंगळवारच्या मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाच्या माध्यमातून अंमलबजावणी झाली. यामुळे या समाजात आनंदाचे वातावरण होते.

मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाचे आता अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने स्वागत होत आहे. या योजनेचा लाभ हा दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना घेण्यात येणार आहे. परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती असेल. यासाठी १० कोटी ८० लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. विज्ञान. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी यासाठी एकूण १० शिष्यवृत्ती राहतील. जीवशास्त्र, लिबरल, आर्ट हे प्रत्येकी ६ तर शेतीसाठी ३ आणि कायदा व वाणिज्यासाठी २ अशा एकूण २७ शिष्यवृत्ती आहेत.

हे ही वाचा

महाराष्ट्र की ‘महा’दुर्घटनाग्रस्त राज्य? 6 महिन्यांत 6 मोठ्या दुर्घटना

समीर भुजबळ यांनी नवाब मलिकांचे केले कौतुक !

राजकीय आंदोलनापूर्वी अधिकाऱ्यांची जात तपासायची का?- भाजपा प्रवक्ता अजित चव्हाणांचा सवाल

अल्पसंख्यांक समाजात सध्या आनंदी आनंद पहायला मिळत असून अजित पवारांचे अभिनंदन करण्यात येत असून बैठक्लीत झालेल्या अन्य निर्णयाला लवकरच यश मिळेल. अशी अशा आता अल्पसंख्यांक समाजाला आहे. यामुळे या निर्णयाला देखील लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होईल असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी