29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रसर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात आता 'एवढी' कपात...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात आता ‘एवढी’ कपात…

सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सिलिंडर गॅस आहे. अन्न,वस्त्र आणि निवारा या मूलभूत तीन गरजांपैकी अन्न शिजवण्यासाठी सिलिंडर गॅसचा वापर अधिकाधिक होतो. मात्र सरकारने काही वर्षापूर्वी या गॅसचे दर हे गगणभर वाढवून ठेवले होते. याचे चटके सर्वसामान्यांना मिळू लागले होते. गॅसच्या दरात काही दिवसांपूर्वी आकराशे ते बाराशे रुपयांपर्यंत दरवाढ होती. मात्र आता काही दिवसांपूर्वी या दरात कपात करून सिलिंडर गॅस हा 900 रुपयांना विकला जात होता. मात्र या गॅस दराची कपात होते न होते तोवर आज बुधवार 4 ऑक्टोम्बर या दिवशी आणखी 300 रुपयांनी कपात केली. म्हणजे आता अवघ्या 600 रुपयांना सिलिंडर गॅस मिळणार आहे.

37 दिवसांपूर्वीच गॅसच्या दरात कपात केली होती. त्यांनंतर पुन्हा एकदा आज गॅसच्या दरात कपात करण्यात आली. यामुळे आता सर्वसमान्यांना सबसिडी ही आता 300 रुपये मिळणार आहे. याचा फायदा आता उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना  मिळणार आहे. याआधी या योजनेच्या ग्राहकांना 200 रुपये सबसीडीच्या माध्यमातून मिळत होते. आता त्यात आणखी शंभर रुपयांची वाढ होऊन एकूण 300 रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याच बोललं जात आहे. तब्बल चारशे रुपयांनी दर कमी केले आहेत.

मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी वाढवलेल्या सिलिंडर गॅसच्या किंमतीत घसरण केली आहे. याचा फायदा मात्र सामान्यांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत घोषणा केली आहे. या योजेनेचा लाभ घेतलेल्या 10 कोटी भारतीयांना याचा फायदा करून घेता येणार आहे. एवढेच नाही तर मागच्या सप्टेंबर महिन्यात नरेन्द्र मोदींनी देखील बैठक घेतली होती.

हेही वाचा

नशामुक्तीबाबत राज्यशासन ढिम्म! अनुदानाचे तब्बल 1.12 कोटी थकवले…

राजकीय आंदोलनापूर्वी अधिकाऱ्यांची जात तपासायची का?- भाजपा प्रवक्ता अजित चव्हाणांचा सवाल

समृद्धी, बुलेट ट्रेन भूसंपादन प्रकरणात डल्ला मारणाऱ्यांना महसूल मंत्र्यांनी दाखवला घरचा रस्ता

दोनशे रुपये सबसिडी देण्यात आली असून दोनशे रुपयांनी दर कमी करून समान्यांच मन जिंकून घेण्याचा मोदी सरकार प्रयत्न करत आहे. तर मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 75 लाख अतिरिक्त एलपिजी कनेक्शन देण्यास मंजूरी दिली आहे. तीन वर्षासाठी केला जाणाऱ्या या अतिरिक्त एलपिजी कानेक्शनचा 1650 कोटी रुपयांचा वित्तीय भार सरकारच्या तिजोरीवर पडणार असल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी