30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeराजकीयअजित पवार भाजपसोबत का गेले? शरद पवारांनी केला गौप्यस्फोट

अजित पवार भाजपसोबत का गेले? शरद पवारांनी केला गौप्यस्फोट

गेल्या दीड वर्षापासून राज्यातील राजकारण हे बदलू लागलं आहे. कोण कोणत्या पक्षात जात आहे तर कुणी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. असे असताना 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी आठ आमदारांसह भाजपशी घरोबा केला आणि मंत्रीपदे पदरात पडून घेतली. भाजपाशी सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवारांची खेळी असल्याच बोललं जात होतं मात्र यावर आता शरद पवारांनी मौन सोडले आहे.

सध्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळत आहेत. खरं तर हे राजकारणात पहिल्यांदा पहायला मिळालं आहे. तर सुरुवातीला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी चाळीस आमदारांसह बंड केला. त्यानंतर वर्ष होतंय न होतंय तोवर अजित पवारांनी शरद पवार यांना टाटा करत भाजप आणि एकनाथ शिंदेंसह हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली. हे शरद पवारांचं प्लॅनिंग असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता शरद पवारांनीच याबाबत मौन सोडलं आहे.

राजकारणात कधी काय घडेल? बिघडेल याबाबत कुणीच काहीच सांगू शकत नाही. अजित पवारांनी केलेल्या बंडगिरीबाबत स्वत: शरद पवारांनी याबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले की, “तपास यंत्रणांच्या भीतीने अजित पवार गटाने हा निर्णय घेतला आहे. माझ्याकडे 6 ते 7 सहकारी आले होते. सरकारला जर पाठिंबा दिला नाही तर जेलमध्ये जावं लागेल. आमच्यासमोर दोन पर्याय आहेत. एक तर भाजपमध्ये जाण्याचा आणि दूसरा पर्याय जेलमध्ये जाण्याचा यापैकी सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.” असा मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.

हे ही वाचा 

‘टोपी घातल्याने कुणी गांधी होत नाही!’ जितेंद्र आव्हाड यांची अण्णा हजारेंवर बोचरी टीक

समृद्धी, बुलेट ट्रेन भूसंपादन प्रकरणात डल्ला मारणाऱ्यांना महसूल मंत्र्यांनी दाखवला घरचा रस्ता

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, बहुजनांनो एक व्हा ! भारत तुमचा आहे

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधिबाबत काय म्हणाले शरद पवार? 

“अजित पवार हे आता सोडून भाजपशी मिळाले आहेत. त्यामुळे आता ते आमचे राहिले नाहीत. भाजप हे इतर पक्षांना फोडण्याचं काम करत आहेत. भाजपने आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडण्याच काम केले आहे.” असे शरद पवार यांनी एका वर्तमानपत्राच्या मुलाखतीत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर पुढं ते म्हणाले की, “पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नसून पक्षातील नेत्यांचाही निर्णय होता.” असे ते म्हणाले.

त्याचप्रमाणे अजित पवार गटाबद्दल सांगत असताना त्यांनी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांबाबत देखील वक्तव्य केलं आहे. “राहुल गांधी हे लवकरच देशातील नेतृत्व करत राहतील. मात्र मी यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही.” असं शरद पवार म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे येत्या निडणुकीत अजूनही हालचाली होणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. यामुळे आता नेमका सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी