30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
HomeराजकीयCongress President Election: मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांना रिमोट कंट्रोलने नियंत्रित...

Congress President Election: मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांना रिमोट कंट्रोलने नियंत्रित करण्याचा प्रश्नच पडत नाही

भारत जोडो' यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधी म्हणाले की, या यात्रेत ते एकटे नाही आहेत आणि लाखो लोक या यात्रेत सामील झाले आहेत कारण ते लोक देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि असमानता यांना कंटाळले आहेत.

काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रमुख हे गांधी कुटुंबाकडून रिमोट कंट्रोलने नियंत्रित केले जाऊ शकतात अशी शक्यता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी फेटाळून लावली. त्यांनी असे प्रतिपादन केले की, पक्षाध्यक्षाच्या निवडणूकीत आपली उमेदवारी घोषित केलेले दोन्ही नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे मोठे आणि समजूतदार लोक आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधी म्हणाले की, या यात्रेत ते एकटे नाही आहेत आणि लाखो लोक या यात्रेत सामील झाले आहेत कारण ते लोक देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि असमानता यांना कंटाळले आहेत.

काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष गांधी घराण्याद्वारे रिमोट कंट्रोलने नियंत्रित केले जाऊ शकतात या काही लोकांकडून होत असलेल्या टीकेबद्दल विचारले असता, पक्षाचे माजी प्रमुख म्हणाले की, जे लोक (निवडणुकीत) उभे आहेत त्या दोघांचीही स्वत:ची अशी ओळख आहे व त्यांचा स्वतंत्र दृष्टीकोन आहे. ते समजूतदार व कतृत्वाने मोठे लोक आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की यापैकी कोणीही रिमोट कंट्रोलने नियंत्रित केले जाऊ शकतात आणि खरे सांगायचे तर अशा प्रकारचा दृष्टीकोन त्या दोघांचाही अपमान करणारा आहे.

हे सुद्धा वाचा –

Uddhav Thackeray: जयदेव ठाकरेंचा शिंदे गटाला पाठींबा; मुलगा जयदीप मात्र उद्धव काकांसोबत

Eknath Shinde : एकनाथ शिंदे रात्री आठ वाजता सुद्धा सामान्य लोकांना भेटतात

Mohan Bhagwat Statement: मोहन भागवत यांच्या पापलाक्षणाच्या विधानावर आता चर्चांना उधाण!

गांधींनी असेही सांगितले की, त्यांचा ‘तपस्या’ या गोष्टीवर गाढ विश्वास आहे. कन्याकुमारी ते काश्मीर हे सुमारे 3,500 किमीचे अंतर पायी जाणाऱ्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत हाच संदेश पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.

गांधी पुढे म्हणाले की, द्वेष आणि हिंसाचार पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे आणि आम्ही यात सहभागी असलेल्या कोणाशीही लढण्यास तयार आहोत. आमचा नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध आहे कारण त्यामुळे आमचा इतिहास, परंपरा विकृत होईल. आम्हाला विकेंद्रित शिक्षण व्यवस्था हवी आहे.

काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रा ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी डोळयासमोर ठेवून केली नाही तर आम्हाला भाजप-आरएसएसकडून होणाऱ्या देशाच्या विभाजनाविरोधात लोकांना एकत्र करायचे आहे, असेही गांधी म्हणाले.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी