26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप; ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकार दहशत निर्माण...

संजय राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप; ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकार दहशत निर्माण करते

टीम लय भारी

मुंबई :- गेल्या काही काळापासून मविआ सरकारमधील अनेक नेत्यांच्या घरी ईडी छापे टाकत आहेत. काल एकनाथ खडसे यांची भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. केंद्र सरकार या संस्थांच्या माध्यमातून दहशत निर्माण करत आहे असा आरोप शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे (Shiv Sena leader Sanjay Raut has attacked BJP).

आज संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले, “सीबीआय, ईडी या यंत्रणांची प्रतिष्ठा केंद्र सरकारने धुळीला मिळवलीय. या संस्थांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. पण हे फार काळ चालणार नाही. असा यंत्रणांचा दुरुपयोग करणारे नेते फार काळ टिकत नाहीत. यंत्रणांना फक्त विरोधकांच्या घराचे पत्ते माहिती आहेत, सत्ताधारी नेत्यांचे दिसत नाहीत. आम्ही त्यांना सत्ताधाऱ्यांचे पत्तेही पाठवू असे संजय राऊत म्हणाले आहेत (Sanjay Raut has said that we will also send them the addresses of the authorities).

वर्षा गायकवाडांच्या निर्णयावर अतुल भातखळकरांची घणाघात टीका

मुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला

यानंतर, पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचा महापौर बनवणे हे आमचे ध्येय असल्याचं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवड शहरात किमान 50 नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.  50 मध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर होत नाही असा प्रश्न राऊतांना केला.  त्यावर राऊत म्हणाले जर 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये महापौर का होणार नाही? असा सवाल करत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायची की नाही ते योग्य वेळी ठरवू, असेही राऊतांनी सांगितले.

Shiv Sena leader Sanjay Raut has attacked BJP
संजय राऊत

प्रकाश आंबेडकर का गेले तीन महिन्याच्या सुट्टीवर; जाणून घ्या

Sanjay Raut’s “Masterstroke” Jibe At Ravi Shankar Prasad’s Cabinet Exit

केंद्रात सहकार खाते तयार झाले आहे. ते केवळ महाराष्ट्र्राला त्रास देण्यासाठी तयार केले असेल तर हा आणखी एक सत्तेचा गैरवापर आहे. जर सहकार मजबूत करण्यासाठी हे नवीन खाते असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करतो. सहकार हा राज्यघटनेनुसार राज्यांचा विषय आहे. मात्र राज्यातील सहकार संपवण्यासाठी केंद्रातील सहकार खाते काम करणार असेल, तर तो लोकशाहीला फार मोठा धोका आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत (Sanjay Raut has said that democracy is in great danger).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी