32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
HomeराजकीयNCB, ED वापरून झाली असेल तर सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा : संजय...

NCB, ED वापरून झाली असेल तर सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा : संजय राऊत

टीम लय भारी

नाशिक: महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या निमित्तानं नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केंद्र सरकारवर तुफानी हल्ला चढवला. ‘दिल्लीत अनेक डोमकावळ्यांची फडफड सुरू असते, पण सरकार पाडण्याची सुपारी ते फोडू शकत नाहीत. NCB, ED हे सगळं वापरून झालं असेल तर आमचं सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा’, असा सणसणीत टोला राऊत यांनी भाजपला हाणला (Shiv Sena MP Sanjay Raut slammed BJP).

संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांनी केलेल्या कामांची उद्घाटनं केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. ‘हे सरकार पुलोदच्या प्रयोगाची पुनरावृत्ती आहे. त्यावेळी अनेक पक्ष एकत्र आले होते, तसंच या सरकारमध्ये आहे. सैन्य बोलावलं तरी हे सरकार पडणार नाही,’ असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

अमित शहा काश्मीर दौऱ्यावर आहेत; संजय राऊत म्हणाले, तिकडेच थांबायला सांगा!

संजय राऊतांनी १०० कोटी लसीकरणाच्या आकडेवारीसंदर्भात उपस्थित केली शंका, म्हणाले…

संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की शरद पवारांचे अशी टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांना राऊत यांनी सुनावले. ‘मी ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही प्रवक्ता आहे. शरद पवार हे कोणी परगृहावरून आलेले नाहीत. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना गुरू मानलंय. त्याचं बोट धरून राजकारणात आल्याचं जाहीरपणे सांगितलंय. मला प्रश्न विचारणाऱ्या सोमय्या यांनी याविषयी माहिती घ्यावी,’ असा टोला राऊत यांनी हाणला. ‘माझा कणा मजबूत आहे, कोणी कितीही हल्ले केले तरी शिवसेनेसाठी मी उभा आहे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

पंजाबमधील राजकीय गोंधळामागे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा सहभाग; शिवसेनेचा हल्लाबोल

In 2 years of MVA, Uddhav-Pawar ties deepen but Sena & NCP cadre not ready to be friends

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी